---Advertisement---

IND VS NZ; दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, स्टार खेळाडू फिट..!

On: मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024 9:26 AM
---Advertisement---

पुणे कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान जखमी झाला होताा. बेंगळुरू कसोटी सामन्यात त्याने थोड्याच काळासाठी विकेटकीपिंग केली. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टिरक्षक म्हणून दिसला. पण पंत दुसऱ्या डावात फलंदाजीला आला. त्याने 99 धावांची खेळी खेळली. आता पंतशी संबंधित आनंदाची बातमी अशी आहे की तो पुणे कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या स्थानाला कोणताही धोका नाही.

बेंगळुरू कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या रिषभ पंतला पुणे कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिषभ पंत आता पूर्णपणे फिट असून तो 24 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहे. डिसेंबर 2022 मध्ये रिषभ पंतच्या गुडघ्याला एका कार अपघातात दुखापत झाली होती आणि त्याच गुडघ्याला विकेटकीपींग करताना रवींद्र जडेजाचा चेंडू त्याच्यावर लागला होता. ज्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता.

मात्र, चांगली गोष्ट अशी की  पंतने भारताच्या दुसऱ्या डावातही फलंदाजी केली. त्याने 105 चेंडूत 99 धावा केल्या. परंतु या डावात तो 100 टक्के फिट दिसला नाही. यानंतर चौथ्या डावात तो यष्टिरक्षणासाठी आला नाही. तेव्हा तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. आता दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे. त्यामुळेच दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात बदल करण्यात आला असून त्यात पंतच्या दुखापतीचा उल्लेख नाही.

हेही वाचा-

IND vs NZ: संघाला मोठा धक्का! अनुभवी खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर
ऑस्ट्रेलिया दाैऱ्यासाठी भारतीय अ संघाची घोषणा, मराठमोळ्या खेळाडूची कर्णधारपदी वर्णी
खेळपट्टी कोरडी करण्यासाठी पाकिस्तानने लढवली शक्कल! मैदानात बसवले भलेमोठे फॅन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---