---Advertisement---

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला खेळाडूंसाठी ही आहे खुशखबर

On: शुक्रवार, जुलै 5, 2019 4:24 PM
---Advertisement---

६६ व्या सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महिला पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पटना येथे ११जुलै ते १४ जुलै २०१९ रोजी होणार आहे.

भारतीय कबड्डी हौशी संघाचे अडमिनिस्टर म्हणून प्रशासनाकडून नेमुक करण्यात आलेले न्यायमूर्ती एस.पी.गर्ग यांनी राष्ट्रीय स्पर्धेच्या मोठ्या अयोजनाच्या बाबतीत भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या कार्यलाय व यजमान बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. स्पर्धा तयारीसाठी सर्वांनी सहभाग घेऊन यशस्वी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि पूर्णपणे कबड्डीच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रशासकाने कबड्डीचा एक शूज जोडी व ट्रॅक सूट प्रत्येक सहभागी खेळाडूला भारतीय हौशी कबड्डी संघाच्या विकास निधीतून देण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रॅक सूट आणि कबड्डी शूज जोडीचा वितरण स्पर्धेच्या ठिकाणी योग्य त्या साईझ (आकार) नुसार प्राप्तकर्त्याकडून विनामूल्य करण्यात येईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

एशियन गेम्स सिल्वर मेडलिस्ट सायली केरीपाळे कडे महाराष्ट्र महिला संघाचे नेतृत्व

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघाची घोषणा, पुण्याच्या पाच खेळाडूंना संघात स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment