---Advertisement---

आनंदाची बातमी! WTC फायनलपूर्वी भारतीय संघ बनला टॉपर, ऑस्ट्रेलियाची 15 महिन्यांची बादशाहत समाप्त

Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आयसीसी पुरुष कसोटी रँकिंग नुकतीच जाहीर झाली. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने वार्षिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे सोडले आहे. ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ कसोटी क्रमवारीत मागील 15 महिन्यांपासून अव्वलस्थानी होता. आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पछाडत अव्वलस्थान काबीज केले आहे. याची माहिती आयसीसीने सोशल मीडियावरून दिली आहे.

आयसीसी कसोटी रँकिंग (ICC Test Ranking) जाहीर होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ 122 गुणांसह अव्वलस्थानी होता. दुसरीकडे, भारतीय संघाचे 119 गुण होते. त्यानंतर आता भारतीय संघाने 121 गुणांसह अव्वलस्थान गाठले आहे, तर ऑस्ट्रेलिया संघाचे फक्त 116 गुण आहेत.

https://twitter.com/ICC/status/1653308396672802817?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1653308396672802817%7Ctwgr%5Ed3a9d3c171f30af4aac5a9da7e98f57ec06eb5fa%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-test-ranking-india-reached-on-top-australia-2nd-number-before-world-test-championship-final-2397972

पुढील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना
विशेष म्हणजे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पुढील महिन्यात म्हणजेच 7 ते 11 जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना लंडनच्या के ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कोणता संघ विजयी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (good news team india beat australia at the top of test team rankings ahead of wtc final 2023 rohit sharma virat kohli know here)

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भारत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराटने गंभीरला त्याची जागा दाखवली’, LSG vs RCB सामन्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
“मला लाज वाटते’, गंभीर-विराटच्या अभूतपूर्व राड्यानंतर हरभजनने जागवल्या जुन्या आठवणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---