आवेश खान
भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याने याचवर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मात्र तो गोलंदाजी करताना सर्वाधिक धावा खर्च करतो यामुळे चर्चेत आला आहे. यामुळे भारताचे अनेक चाहते त्याला संघाबाहेर काढा अशी मागणी करत आहेत.
आवेशला आशिया चषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध संघात निवडले गेले. या सामन्यात त्याने 2 षटके गोलंदाजी करताना 19 धावा देत 1 विकेट घेतली. तर हाँगकाँ विरुद्ध 4 षटके टाकताना 53 धावा देत एक विकेट घेतली. तो 4 षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. यामुळे त्याचे टी20 विश्वचषकातील स्थान धोक्यात आले आहे.
रविचंद्रन अश्विन
भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा स्टार खेळाडूंच्या यादीत येतो. त्याने अनेक सामन्यांच्या त्याच्या आश्चर्यकारक फिरकीने विरोधी फलंदाजांना सळो की पळो करत भारताला सामने जिंकून दिले आहेत. मात्र टी20 प्रकारच्या क्रिकेटपासून तो बराच काळ दूर राहिला. तरीही त्याला आशिया चषकाच्या संघात निवडले गेले. त्याला श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने 4 षटकात 32 धावा देत एक विकेट घेतली.
त्यातच यंदाचा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. तेथिल खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पूरक आहेत. यामुळे भारतीय संघ चार वेगवान आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. संघाकडे सध्या युझवेंद्र चहल आणि रवि बिश्नोई असल्याने अश्विनला अंतिम अकरामध्ये खेळण्याच्या संधी कमी आहेत.
केएल राहुल
भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) हा त्याच्या धमाकेदार फलंदाजी करण्यासाठी ओळखळा जातो. त्याने सलामीवीर म्हणून संघासाठी अनेक उत्तम खेळी केल्या आहेत. मात्र आशिया चषकात त्याने निराशा केली आहे. त्याने आशिया चषकात 4 सामने खेळले असून त्यात एकच अर्धशतक केलेले आहे. तसेच त्याने या स्पर्धेत 26.40च्या सरासरीने 132 धावा केल्या आहेत.
राहुलच्या या निराशाजनक प्रदर्शनामुळे त्याला टी20 विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. तर त्याच्या जागी इशान किशन याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इशानने यावर्षी भारताकडून 14 टी20 सामने खेळले असून त्यामध्ये 30पेक्षा अधिक सरासरीने 430 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला नाही पटला रोहित शर्माचा नवीन बॅटिंग ऍप्रोच; म्हणाला, ‘मी माझ्या स्टाईलने…’
‘किंग’ कोहलीचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत आजोबा, खाली झुकून केला मुजरा
आगामी टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा ‘मेंटर’ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची नियुक्ती