पुणे: नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस क्रीडा प्रकारात सांघिक गटात पटकावल्यामुळे मला कारकिर्दीत आणखी उज्वल यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळाली, असे पुण्यातील यशस्वी महिला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा सहस्त्रबुद्धे-को
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून मायदेशी परतल्यावर लक्ष्य व सुजनील केमो इंडस्ट्रिज् यांच्या तर्फे पूजा सहस्त्रबुद्धे-कोपरक
पूजा सहस्त्रबुद्धे-कोपरकर पुढे म्हणाली की, राष्ट्रकुल स्पर्धेच्या मोहिमेत केंद्र शासनाकडून आम्हांला उत्तम साहाय्य मिळाले. परंतु केंद्र शासनाला इतरही क्रीडा प्रकारांकडे लक्ष द्यावे लागत असल्यामुळे या साह्हाय्यावर मर्यादा येतात. त्यामुळेच लक्ष्यसारख्या संस्थांचे सहकार्य बहुमोल ठरते.
राष्ट्रकुल स्पर्धा हा एक वेगळा अनुभव होता, असे सांगून ती म्हणाली की, पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, मेरी कोम यांसारख्या उच्च दर्जाच्या खेळाडूंशी या निम्मिताने संवाद साधता आला. त्यांचा सराव व ते घेत असलेले परिश्रम पाहता आले. तसेच, इतर अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्
भविष्यातील कामगिरीसाठी हे सारे खूपच महत्वाचे ठरणार आहे. भारतीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय आणि परदेशी प्रशिक्षक मॅस्सीमो यांच्या मार्गदर्शनाचा आम्हांला खूपच फायदा झाला. मॅस्सीमो गेल्या 8 वर्षांपासून भारतीय संघाबरोबर असल्यामुळे त्यांना आमचा खेळ पूर्णपणे माहित आहे.त्यामुळे ते आमच्या शैलीनुसार आमच्या प्रशिक्षणात योग्य ते बदल करत असतात.
पूजाचे पती व माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पटू अनिकेत कोपरकर यांनी सांगितले की, पूजाने या यशासाठी खडतर मेहनत केली आहे. रोज 8 ते 10 तास ती सराव आणि व्यायामासाठी देत असते. तसेच, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सराव शिबिरे आणि स्पर्धांमुळे तिचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असते. येत्या आठवड्यात ती युरोपियन स्पर्धेसाठी जाणार असून तिच्या समोर आता आशियाई आणि जागतिक स्पर्धेचे आव्हान असणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा किंवा ऑलंपिक स्पर्धा खास असते कारण ती चार वर्षातून एकदा येते. भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण आहे, कारण वर्षभर अनेक स्पर्धा खेळत तुम्हाला अव्वल ४ खेळाडूंमध्ये स्थान मिळवायचे असते.
त्यामुळे सातत्य अतिशय गरजेचे आहे. २०१० आणि २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत पूजाचे स्थान अगदी काही गुणांनी/क्रमवारीने हुकलं. मात्र जिद्द आणि प्रयत्न या दोन्हीच्या बळावर तिने भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवले आणि विशेष म्हणजे ती सुवर्णपदकाची मानकरी देखील ठरली.
केवळ 12 वर्षाच्या पृथाला राष्ट्रीय स्तरावर दुसरे मानांकन असून तिची गुणवत्ता व कामगिरी पाहून लक्ष्यने तिची निवड केली असल्याचे लक्ष्यचे स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन विभागाचे प्रमुख सुंदर अय्यर यांनी नमूद केले