भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय चांगल्या पद्धतीने झाला म्हणून दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांना आनंद झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांनंतरही भारताने माघार घेतली नसल्याचे त्यांनी कौतुक केले आहे.
स्मिथ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत. मालिका निर्धारित वेळेत सुरु करण्याबाबत अनेक शंका निर्माण झाल्या होत्या आणि योग्य व्यवस्था करण्यात यावी म्हणून कसोटी मालिका आठवडाभर पुढे ढकलण्यात आली होती. अखेर ही मालिका निर्धारित वेळापत्रकानुसार कोणत्याही अडथळ्याविना पार पडल्याने स्मिथ यांनी आनंद व्यक्त केला.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल बोलताना ग्रॅमी स्मिथ यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “बीसीसीआय, सौरव गांगुली, भारतीय खेळाडू आणि व्यवस्थापनाचे आभार ज्यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. या अनिश्चिततेच्या काळात तुमच्या प्रतिबद्धतेने एक आदर्श ठेवला आहे, ज्याचे अनुसरण बाकीचे करू शकतात.”
Big thank you @BCCI @JayShah @SGanguly99 and the Indian players and management for the faith you showed in SA cricket’s ability to pull off a safe and successful tour. Your commitment at an uncertain time has set the example that a lot can follow.
— Graeme Smith (@GraemeSmith49) January 23, 2022
हे ट्वीट करत त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डाला इशारा दिला आहे. कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियाने गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका पुढे ढकलली होती. तसेच, डिसेंबर २०२० मध्ये बायो बबल असतानाही कोरोना प्रकरणे सापडल्यामुळे मर्यादित षटकांची मालिका मधेच सोडून इंग्लंड संघ माघारी परतला होता. त्यामुळे हे ट्वीट या दोन देशांसाठी असल्याचं म्हटलं जात आहे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात सेंच्युरियनमधील विजयाने झाली होती, पण हा भारताचा या दौऱ्यामधील एकमेव विजय ठरला. कसोटी मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेने शेवटचे दोन सामने जिंकत मालिका २-१ ने आपल्या नावी केली.
तसेच एकदिवसीय मालिकेत यजमान संघाने ३-० ने मालिका नावावर केली. भारतीय संघ रविवारी केपटाउन येथे पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजयाच्या खूप जवळ पोहोचला होता. पण फक्त ४ धावांनी भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
केपटाऊन वनडेतील ‘ही’ चूक टीम इंडियाला नडली! आयसीसीने ‘राहुलसेने’वर उगारला कारवाईचा बडगा
‘लखनऊ सुपरजायंट्स’ नाव पाहाताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; युजर्सने लावला पुण्याच्या टीमची संबंध
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची
व्हिडिओ पाहा – नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?