तुम्ही कितीही प्रसिद्ध किंवा महान व्यक्ती असाल तरी मुलांपुढे तुमचं महानत्व कायमच गळून पडतं. मुलांच्या बाललीलांपुढे आणि हट्टांपुढे सगळ्या महत्वाच्या गोष्टी विसरून आपल्याला लहान व्हावंच लागतं. असाच काहीसा अनुभव दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाचा विद्यमान डायरेक्टर ग्रॅमी स्मिथला आला.
त्याचे झाले असे, की दक्षिण आफ्रिकन संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी ग्रॅमी स्मिथ आभासी पत्रकार परिषदेला संबोधित करत होता. कोरोनामुळे तो ही पत्रकार परिषद आपल्या घरूनच संबोधित करत होता. त्यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देत असतांना त्याचा मुलगा मध्ये आला. त्याला बुटाची लेस बांधून घेण्यासाठी वडिलांची मदत हवी होती.
त्याचा हा हट्ट पाहून ग्रॅमी स्मिथने देखील उत्तरं द्यायची थांबवून त्याला लेस बांधून दिली. हा प्रकार बघताच पत्रकारांनाही हसू आवरले नाही. तसेच एका पत्रकाराने हे पाहून ‘वडिलांचे कर्तव्य सर्वप्रथम’ अशी गमतीशीर कमेंटही केली. स्मिथनेही त्याला हसून दाद दिली. हा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.
Graeme Smith’s son crashing a press conference so he can get his shoelaces tied is absolutely adorable ❤️ pic.twitter.com/OorqWXm9Pz
— Wisden (@WisdenCricket) January 22, 2021
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्बल चौदा वर्षांनतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी आणि टी-20 सामन्याची मालिका 26 जानेवारी पासून खेळली जाणार आहे. यापैकी दोन सामन्याची कसोटी मालिका अगोदर खेळली जाईल. त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तानमध्ये दाखलही झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
विराटला नेतृत्त्वपदावरुन हटवाल, तर टीम इंडियाची परंपरा धुळीस मिळेल, दिग्गजाचे मोठे भाष्य
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी युवीसोबत हा सराव केल्याने झाला फायदा, शुबमन गिलने केला खुलासा
तुला वडिलांच्या कबरीजवळ पाहून माझं मन, सिराजच्या कृतीने अभिनेता धर्मेंद्रच्या डोळ्यात आणलं पाणी