जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने चांगले प्रदर्शन करत भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने अप्रतिम गोलंदाजी केली व भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. या सामन्यानंतर भारतीय फलंदाजांवर अनेक टीका झाल्या. भारतीय युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतवर ही अनेक टीका झाल्या की तो दुसऱ्या डावात बेजबाबदार फटका खेळून बाद झाला. मात्र इंग्लंडच्या माजी खेळाडूने पंतची पाठराखण केली आहे.
इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने रिषभ पंतच्या चाहत्यांना खास आवाहन केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतवर जास्त टीका करू नये, असं त्यानी म्हटलं आहे. ग्रॅमी स्वानच्या म्हणण्यानुसार पंतला आक्रमक पद्धतीने खेळण्याची मुभा द्यावी, कारण हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दुसर्या डावामध्ये पंतने ज्या प्रकारचे फटके खेळले त्याबद्दल टीका केली गेली. पंतने पुढे जाऊन जोरदार फटकारे मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटवर नीट बसला नाही आणि हवेमध्ये उडाला आणि त्याने महत्त्वपूर्ण क्षणी आपली विकेट गमावली.
ग्रॅमी स्वानच्या मते, पंत त्याच्या अशाच खेळीमुळे खूप यशस्वी झाला. त्याच्या फलंदाजीमध्ये काही बदल केल्यास ते योग्य होणार नाही.
स्पोर्ट्सकिडाशी झालेल्या विशेष संभाषणात ग्रॅमी स्वान म्हणाला, “रिषभ पंतच्या रुपात भारताला सुपरस्टार फलंदाज मिळाला आहे. या सामन्याआधी अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध त्यानी शतकी खेळी करुन भारतीय संघाला विजय मिळवला होता . त्याने जोरदार प्रहार करत ही खेळी केली होती . पंतने अप्रतिम शतकी खेळी केली होती. जर त्या दिवशी तो मैदानात गेला असता आणि परिस्थितीनुसार खेळला असता आणि बचाव केला असता तर तो सामना भारताला जिंकता आला नसता.”
रिषभ पंत सामना जिंकणारा खेळाडू
ग्रॅमी स्वान पुढे म्हणाले, “रिषभ पंत सामना जिंकणारा आहे आणि मला भारतातील क्रिकेट चाहत्यांना सांगायचे आहे की जी वस्तू खराब झाली नाही, तिची दुरुस्ती का केली पाहिजे. रिषभ पंतला बदलू नका. त्याला अपयशी होऊ द्या, तो प्रतिभाशाली खेळाडू आहे.”
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंत दुसऱ्या डावात ४१ धावांवर बाद झाला होता. तो या डावात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. भारताने या डावात सर्वबाद १७० धावा केल्या होत्या आणि पहिल्या डावातील ३२ धावांच्या पिछाडीमुळे न्यूझीलंडला १३९ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान न्यूझीलंडने केन विलियम्सन आणि रॉस टेलरच्या नाबाद ९६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर ४६ षटकांमध्ये सहज पूर्ण केले आणि पहिल्या कसोटी अंजिक्यपदावर नाव कोरले.
महत्वाच्या बातम्या
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ तिघांचा समावेश झाला तर ‘मिशन इंग्लंड’ होणार फत्ते
बायको असावी तर अशी! बुमराहसाठी पत्नी संजनाने बनवले ‘रोमँटिक जेवण’, फोटो होतोय व्हायरल






