भारतीय संंघ श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Of Sri Lanka) आहे. तेथे 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडमधील खेळाचे सामान बववणाऱ्या एका कंपनीनं असं वक्तव्य केलं आहे. जे ऐकूण भारतीय फॅन्स भडकले आहेत. इंग्लंडमध्ये असणाऱ्या ग्रे-निकाॅल्स नावाच्या कंपनीनं माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी आम्हाला माहित असं सांगितलं, त्यामुळे धोनीचे चाहते या वक्तव्यावर भडकले आहेत.
सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरु आहे. यादरम्यान ग्रे-निकॉल्स कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंड यष्टीरक्षक जेमी स्मिथ आणि वेस्ट इंडिजचा जोश दा सिल्वा यांनी ग्रे-निकेल कंपनीचं ग्लोव्ह्ज घातलं होतं. यांचा फोटो ग्रे-निकाॅल्सनं फेसबुकवर पोस्ट केला आणि लिहिलं, “जर तुम्ही ग्रे-निकाॅल्स वापरत नसाल तर तुम्ही यष्टिरक्षक आहात का? जेमी स्मिथ आणि जोश दा सिल्वा हे यष्टीरक्षक आहेत. हे पाहून छान वाटत आहे.”
ग्रे-निकाॅल्सच्या या प्रश्नावर एका चाहत्यानं विचारलं की, “तुम्हाला एक खेळाडू माहिती आहे का? ज्याचं नाव एमएस धोनी होतं.” ग्रे-निकल्स कंपनीनं यावर उत्तर दिलं की, “यांच्याविषयी कधी ऐकलं नाही.” या उत्तरावर यावर एका चाहत्यानं कमेंट केली की, “याचं हेच मुख्य कारण आहे जे खेळाडू कधीतरी खेळतात तेच ग्रे-निकाॅल्स कंपनीचं ग्लोव्ह्ज वापरतात.
धोनीबद्दल बोलायचं झालं तर, महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 2011चा विश्वचषक देखील जिंकला आहे. धोनीचं वय सध्या 43 वर्ष आहे. धोनी हा भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings’) संघाकडून खेळतो भारतासाठी त्यानं 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
90 कसोटी सामन्यात त्यानं 4,876 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याची सरासरी 38.09 राहिली आहे, तर सर्वोच्च धावसंख्या 224 राहिली आहे. कसोटीमध्ये धोनीच्या नावावर 33 अर्धशतक आणि 6 शतक आहेत. 350 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्यानं 50.57च्या सरासरीनं 10,773 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 183 आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 87.56 राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 73 अर्धशतक आणि 10 शतक आहेत.
धोनीनं 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 37.60च्या सरासरीनं 1,617 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 56 राहिली आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट 126.03 राहिला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीनं 2 अर्धशतक झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एका पाठोपाठ श्रीलंकेला दुसरा झटका! भारतासाठी धोकादायक ठरणारा खेळाडू टी20 मालिकेतून बाहेर
अर्शदीप सिंगचं नशीब उजळलं, निवडकर्ते देणार कसोटी मालिकेत मोठी संधी?
ऑलिम्पिक 2024, तिरंदाजीत 36 वर्षांपासून दुष्काळ, यावेळी भारताला पदक मिळणार का?