क्रिकेटविश्वात अनेक महान फलंदाज होऊन गेले. त्यातील काहींनी अविश्वसनीय कामगिरी करत चाहत्यांच्या मनात आजही त्यांचे स्थान कायम ठेवले आहे. अशा या दिग्गजांची मालिका म्हणजे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा हंगाम 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये वेस्टइंडिजच्या संघाचे नेतृत्व ब्रायन लारा करणार आहे. या स्पर्धेत आठ संघ खेळणार आहेत. त्यातील पहिला सामना कानपूरच्या ग्रीनपार्कवर खेळला जाणार आहे. या आठ संघातील काही खेळाडू ग्रीनपार्कवर खेळले असून काही पहिल्यांदाच खेळणार आहेत.
कानपूरमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम भारताचा दिग्गज अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. त्याने या मैदानावर 12 सामने खेळले असून त्यातील 4 कसोटी आणि सात वनडे सामने आहेत.
ब्रायन लारा याने त्याच्या कारकिर्दीची सुरूवात 1990मध्ये केली होती. तर 2007मध्ये निवृत्ती घेतली होती. त्याला खेळताना पाहण्यासाठी कानपूर येथिल चाहते उत्सुक असतील कारण तो सचिनला टक्कर देणारा खेळाडू आहे. अशा या दोघांची जुगलबंदी पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत. लाराने जवळपास सर्व क्रिकेट ग्राउंडवर उल्लेखनीय खेळी करत आपली छाप सोडली आहे. मात्र ग्रीनपार्कवर खेळण्याची त्याची पहिलीच वेळ असणार आहे. तसेच या स्पर्धेतील सर्वाधिक तिकिटे भारत-वेस्ट इंडिज सामन्याची विकली जात आहेत.
टी20 प्रकारच्या या स्पर्धेतील पहिला सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील सामने कानपूर, डेहराडून, रायपूर, इंदोर येथे खेळले जाणार आहेत. तसेच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना 14 सप्टेंबरला ग्रीनपार्क, कानपूर येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 1 ऑक्टोबरला रायपूर येथे खेळला जाणार आहे.
ब्रायन लाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी
131 कसोटी सामने- 11953 धावा (34 शतके, 48 अर्धशतके)
299 वनडे सामने – 10405 धावा (19 शतके, 63 अर्धशतके)
3 टी20 सामने – 99 धावा
431 एकूण सामने – 22457 धावा
एका डावात नाबाद 400 धावा केल्या
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या शतकानंतर पाकिस्तानी दिग्गजाचे अनपेक्षित विधान! आता स्वत:च होतोय ट्रोल
टी20 विश्वचषकात विराटने ‘या’ क्रमांकावर फलंदाजी करावी, ‘द ग्रेट वॉल’ने दिला सल्ला
जडेजाच्या विरोधात रचला गेला कट? ‘त्यामुळे’ नाही खेळणार टी-20 विश्वचषक