महिला हॉकीमध्ये भारतीय संघाला खास कामगिरी करण्यात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० च्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) सुरुवातीलाच भारतीय महिला हॉकी संघाने निराश केले. ग्रेट ब्रिटनने पूल एमधील सामन्यात भारताला ४-१ ने पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवामुळे हॉकीमध्ये भारतीय महिलां संघाला सलग तिसरा पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढवली आहे.
टोकियो ऑलिंपिकमधील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने भारतीय महिला हॉकी संघ मैदानात उतरला होता. मात्र, सामन्यात दुसऱ्या मिनिटालाच ग्रेट ब्रिटनने गोल करत शानदार सुरुवात केली. त्यांनी केवळ ७५ सेकंदाच्या आत भारतावर १-० अशी आघाडी मिळवली होती. (Great Britain Womens Hockey Team Beat Indian Womens Hockey Team 4-1 )
भारतीय महिला संघाला ब्रिटन महिला संघ गोल करण्याची एकही संधी देत नव्हता. पहिला क्वार्टर संपायला ३ मिनिटे बाकी असतानाही भारत ०-१ ने मागेच होता.
An inspiring display from #TeamIndia, but we go down fighting against Great Britain.
We will come back stronger. 💙#GBRvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TokyoTogether #Cheer4India #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/eCPg7XyqEA
— Hockey India (@TheHockeyIndia) July 28, 2021
यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत हाफ टाईमपूर्वी पहिला गोल केला. हे केवळ सामन्यातील गोल नाही, तर टोकियो ऑलिंपिकमधीलही भारतीय महिला संघाचा पहिला गोल होता. यानंतर ब्रिटनने चमकदार कामगिरी करत दुसरा गोलही केला. भारत पहिल्या हाफनंतरही १-२ ने पिछाडीवर होता.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली. भारताने दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला एका मिनिटातच ३ पेनल्टी कॉर्नर मिळवण्यात यश मिळवले होते. पण त्यांना गोल करता आला नाही.
तिसरा क्वार्टर संपण्याच्या तीन मिनिटांआधी ब्रिटनने आपला तिसरा गोल केला आणि भारतावर ३-१ अशी आघाडी घेतली. यानंतर सामना संपायला केवळ ३ मिनिटे बाकी असताना ब्रिटनने आपला चौथा गोलही केला आणि भारतावर ४-१ अशी आघाडी घेत सामना खिशात घातला.
विशेष म्हणजे रियो ऑलिंपिकमध्ये ब्रिटनच्या महिला हॉकी संघाने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद
जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?