---Advertisement---

डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद

On: मंगळवार, जुलै 27, 2021 4:51 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्समध्ये शनिवारी (२४ जुलै) भारतीय संघाला पदक मिळवून देण्याची कामगिरी वेटलिफ्टर मिराबाई चानूने केली. तिने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. यानंतर तिने आपल्या आवडत्या पदार्थांबाबत सांगितल्यावर डॉमिनोजने तिची इच्छा पूर्ण केली. यावर आता मिराबाईने ट्वीट करत धन्यवाद दिला आहे.

हे ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर मिराबाईने पिझ्झा आणि आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने सांगितले होते की, तिने महिन्यांपासून आपले आवडते पदार्थ खाल्ले नाहीत. (Indian Weightlifter Mirabai Chanu Thanks To Dominos For Sending Pizza)

ऑलिंपिक मेडल जिंकल्यानंतर ती म्हणाली होती की, “मी अनेक महिन्यांपासून पिझ्झा आणि आईस्क्रीम खाल्ले नाहीत.” तिच्या या वक्तव्यानंतर आघाडीची पिझ्झा कंपनी डॉमिनोजने मिराबाईला आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याची घोषणा केली. मंगळवारी (२७ जुलै) मिराबाईच्या घरी डॉमिनोजने पिझ्झा पाठवला आणि दिलेला शब्दही पाळला.

यानंतर पिझ्झा खातानाचे काही फोटो मिराबाईने शेअर केले आहेत. सोबतच आभारही मानले आहेत. मिराबाईने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “चविष्ट पिझ्झा पाठवण्यासाठी आणि आमच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी धन्यवाद डॉमिनोज इंडिया. माझे कुटुंब आणि मी डॉमिनोजने केलेल्या कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपली मैत्री पुढेही राहिल ही अपेक्षा.”

याव्यतिरिक्त डॉमिनोजने ट्वीट करत लिहिले की, “पदक घरी आणल्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एक अब्जापेक्षा अधिक भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट इतर कोणतीही नसेल की, आम्ही तुम्हाला आयुष्यभर मोफत पिझ्झा देऊ. पुन्हा एकदा अभिनंदन.”

वेटलिफ्टिंगमधील दुसरे ऑलिंपिक पदक
मीराबाईने शनिवारी २०२ किलोग्रॅम वजन उचलत रौप्य पदकाला गवसणी घातली. याबरोबरच भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दुसरे ऑलिंपिक पदक मिळाले. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरीने २००० साली झालेल्या सिडनी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

मिराबाईवर बक्षीसांचा वर्षाव 
मिराबाईवर सध्या कौतुकाबरोबरच बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. तिला मणिपूर सरकारतर्फे १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबरोबरच पोलीस खात्यात उच्च पदावर नोकरीस घेत असल्याचेही मणिपूर सरकारने जाहीर केले आहे. याशिवाय डॉमिनोजने मीराबाईला कायमसाठी फ्री पिझ्झा देणार असल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे मिराबाईला खेळातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?

-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---