---Advertisement---

सगळ्यांनी दिली विराटला संघात जागा, पण विराटला वाटतो हाच खेळाडू भारी

---Advertisement---

बाॅलिवूडचे दिग्गद अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बच्चन यांचे अभिनंदन केले आहे.

विराटने बच्चन यांचे अभिनंदन करताना त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, अमिताभ बच्चनजी तुम्हाला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही भारतीय सिनेमासाठी अनमोल योगदान दिले आहे. तुम्ही प्रत्येकासाठी आता आणि नेहमीच आदर्श व्यक्तिमत्त्व असाल.’

बच्चन यांना ‘दादासाहेब फाळके’ हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन दिल्ली येथे देण्यात आला. यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर बच्चन यांनी सांगितले की, मला अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत.

“जेव्हा या पुरस्काराची घोषणा करण्यात आली तेव्हा माझ्या मनात एक शंका येऊ घातली. मला असे जाणवले की, तुम्ही खूप वर्षे काम केले आहे आता तुम्ही घरी बसा. परंतु, मला राहिलेली खूप काही कामे पूर्ण करायची आहेत,” असे पुरस्कार स्विकारल्यानंतर बच्चन म्हणाले.

विराट सध्या सुट्ट्यांची मजा घेत असून तो या सुट्ट्यांनंतर 5 जानेवारीपासून श्रीलंका विरुद्ध सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाशी लवकरच जोडला जाईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---