क्रीडाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीच्या नवीन अध्यक्षाची घोषणा झाली आहे. आयसीसीच्या निवड समिती बोर्डाने सर्वांच्या एकमताने ग्रेग बार्कले यांना आयसीसीच्या अध्यक्षाच्या रूपात दुसऱ्यांदा दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली आहे. शनिवारी (दि. 12 नोव्हेंबर) आयसीसीकडून याची घोषणा झाली. आयसीसीच्या बैठकीदरम्यान बार्कले यांच्याव्यतिरिक्त बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीच्या प्रमुखपदी निवडले आहे.
मेलबर्न येथे आयोजित केल्या गेलेल्या आयसीसीच्या तिमाही बैठकीदरम्यान मतदान झाले. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रियेत 16 बोर्ड अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता, ज्यात कसोटी सामने खेळणाऱ्या देशांचे पूर्ण 12 सदस्य, 3 सहयोगी देश आणि एक स्वतंत्र महिला संचालकांचा समावेश होता.
कोण आहेत ग्रेग बार्कले?
ग्रेग बार्कले आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2015चे संचालक राहिले आहेत. याव्यतिरिक्त ते नॉदर्न डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे (NDCA) बोर्ड सदस्य आणि अध्यक्षही होते. त्यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक कंपन्यांचाही अनुभव घेतला आहे. ते मूळ न्यूझीलंडचे रहिवासी आहेत.
काय म्हणाले बार्कले?
पुन्हा एकदा आयसीसीचे अध्यक्ष बनवल्यानंतर बार्कले म्हणाले की, “आयसीसीच्या अध्यक्षाच्या रूपात पुन्हा निवडले जाणे सन्मानाची बाब आहे. तसेच, मी आपल्या सहकारी आयसीसी संचालकांना त्यांच्या समर्थनासाठी धन्यवाद देऊ इच्छितो.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “आयसीसीने क्रिकेट हा खेळाला महत्त्व मिळवून देण्यासाठी आणि याच्या भविष्यासाठी एक नकाशा तयार करण्यात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.”
जय शाह यांच्याकडे महत्त्वाचे पद
जय शाह यांच्याकडे आयसीसीच्या सर्वात महत्त्वाच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. ही समिती मोठे वित्तीय वैयक्तिक निर्णय घेते. नंतर या निर्णयांना आयसीसी बोर्ड परवानगी देते.
आयसीसीच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, “प्रत्येक सदस्याने जय शाह यांना वित्त आणि व्यावसायिक व्यवहाराच्या समितीच्या अध्यक्षपदी स्वीकारले आहे. आयसीसी अध्यक्षांव्यतिरिक्त हे समान रूपाने ताकदीची उपसमिती आहे.” या समितीच्या कामात सदस्य देशांमधील महसूल वाटपाचा समावेश आहे.
वित्त आणि व्यावसायिक व्यवहाराच्या समितीचा प्रमुख नेहमी आयसीसी बोर्डाचा सदस्य असतो. अशात शाह यांची निवड होणे हे स्पष्ट करते की, ते आयसीसी बोर्डात बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करेल. (Greg Barclay re elected as ICC chairman know about icc head and jay shah gets this post)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता त्यांची वेळ आली! या दोन नावांपासून सुरू होणार भारतीय संघातील बदलांना सुरुवात?
इंग्लंड जिंको वा पाकिस्तान, वेस्ट इंडिजचा ‘त्या’ बलाढ्य विक्रमाची बरोबरी होणारच; पाहा तो ‘खास’ रेकॉर्ड