आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शनिवारी (12 नोव्हेंबर) सर्वांच्या मतानुसार ग्रेग बार्कले यांना पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवडले आहे. बार्कले यांना दुसऱ्या कार्यकाळाच्या दोन वर्षासाठी पुन्हा एकदा स्वतंत्रपणे निवडले आहे. तवेंगवा मुकुहलानी यांनी आपले नाव मागे घेतल्याने बार्कले यांनी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना नोव्हेंबर 2020मध्ये आयसीसीचे अक्ष्यक्ष म्हणून निवडले होते.
महत्वाचे म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला दोन विद्यमान संचालकांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. सुरुवातीला बीसीसीआयने स्वत: उमेदवार उभे करण्याचा विचार केला पण एकाच्या विरोधात निर्णय घेतला. बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसीच्या बैठकी आणि निवडणुकांना उपस्थित राहणार आहेत.
पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने ग्रेग बार्कले (Greg Barclay) आयसीसीच्या वेबसाईटवर म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड होणे हा सन्मान आहे आणि मी माझ्या सहकारी आयसीसी संचालकांचे त्यांच्या समर्थनासाठी आभार मानू इच्छितो.
बार्कलेंच्या विरुद्ध झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष डॉ. तवेंगवा मुकुहलानी (Dr. Tavengwa Mukuhlani) उभे होते, मात्र त्यांनी आपले नाव मागे घेतले. ते म्हणाले, “मी ग्रेगचे आयसीसी अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करू इच्छितो, कारण त्यांचे नेतृत्व जे सातत्य प्रदान करेल ते खेळाच्या हितासाठी आहे. त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.”
बार्कले सन 2015 मध्ये होते आयसीसीचे संचालक
बार्कले हे पेशाने वकील आहेत. सन 2012 मध्ये त्यांची न्यूझीलंड क्रिकेटचे बोर्डाचे डायरेक्टर म्हणून निवड झाली होती. सन 2015 मध्ये ते आयसीसीचे संचालक देखील होते. 2020मध्ये आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्याआधी बार्कले हे आयसीसी बोर्डावर न्यूझीलंड क्रिकेटचे प्रतिनिधी होते. त्यांनी नॉदर्न डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे (NDCA) अध्यक्षपद देखील सांभाळले आहे.
आयसीसीच्या मतदानात विजय मिळवण्यासाठी उमेदवाराला दोन-तृतीयांश मतं घ्यावी लागतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संदीप लामिछानेनंतर 46 आतंरराष्ट्रीय सामने खेळणारा करणार नेपाळचे नेतृत्व, टी20मध्ये विकेट्सही घेतल्या
बेट लावायची तर अशी! झिम्बाब्वेच्या कर्णधाराने पाळला दिलेला शब्द, सिकंदर रझाला गिफ्ट केली 3 घड्याळे