भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ग्रेग चॅपलने डेव्हिड वॉर्नरचे खूप कौतुक केले आणि सांगितले की, तो आधुनिक काळातील कसोटी क्रिकेटमधील दुसरा सर्वात स्फोटक फलंदाज आहे. चॅपेलच्या मते, या यादीत पहिला क्रमांक वीरेंद्र सेहवाग याचा आहे, जो कसोटी सामन्यांमध्ये स्फोटक फलंदाजी करायचा पण यानंतर डेव्हिड वॉर्नरचा क्रमांक येतो.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सिडनी कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल आणि जास्तीत जास्त धावा करून तो या फॉरमॅटला शानदार पद्धतीने अलविदा करू इच्छितो. डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियन संघाला ज्या प्रकारची सुरुवात करून दिली, ते पाहता संघाला त्याची खूप कमी भासेल, असे म्हणता येईल.
ग्रेग चॅपेल (Greg Chappell) याने डेव्हिड वॉर्नरची तुलना वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्याशी केली आहे. याशिवाय त्याने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या बॉल टॅम्परिंगचाही उल्लेख केला. चॅपल म्हणाला, “बॉल टॅम्परिंगचा मुद्दा डेव्हिड वॉर्नरसोबत नेहमीच राहिल. ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर हा असा डाग होता, ज्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्टपेक्षा जास्त लोकांना जबाबदार धरण्यात आले. ऑस्ट्रेलियन संघाच्या यशात डेव्हिड वॉर्नरने दिलेले योगदान विसरता येणार नाही. आधुनिक युगात डेव्हिड वॉर्नरपेक्षा सलामीवीर म्हणून फक्त वीरेंद्र सेहवाग जास्त धोकादायक होता. डेव्हिड वॉर्नरच्या जागी असाच खेळाडू निवडला जावा, असे माझे मत आहे.” (David Warner is only behind Virender Sehwag the shocking statement of the former coach of India)
हेही वाचा
‘विराट हा रोहितपेक्षा मोठा फलंदाज, त्याला पुन्हा कर्णधार बनवायला हवे…’, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान
IND vs SA: ‘राहुल-विराटशिवाय कोणीही..’, सेंच्युरियनमधील भारताच्या पराभवावर माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान