---Advertisement---

२० धावांची गरज असतानाही ग्रेग चॅपेलंनी धोनीला षटकार मारायला केला होता विरोध

---Advertisement---

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा भारतीय संघाच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ हा वादांनी भरलेला होता. चॅपेल यांच्या प्रशिक्षण काळादरम्यान भारतीय संघात भेद पाडण्यासारखे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

नुकत्याच सोशल मीडियावरील एका लाइव्ह चॅटमध्ये चॅपेल यांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला का षटकार मारण्यास विरोध केला होता? त्या किस्स्याचा खुलासा केला आहे.

चॅपेल यांनी २००५ ते २००७ या काळात भारतीय संघाला प्रशिक्षण दिले होते. त्या दरम्यान धोनी हा  क्रिकेट कारकिर्दीत नव्याने पाऊल ठेवले होते. त्यावेळी चॅपेल यांचे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंशी मतभेद होते. यामध्ये तत्कालिन संघाचा कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश होता.

चॅपेल यांनी लाइव्ह सेशनमध्ये सांगितले की, “मला आठवण आहे की, मी धोनीला पहिल्यांदा मैदानावर फलंदाजी करताना पाहून चकित झालो होतो. त्यावेळी धोनी भारतीय संघातील उभरता खेळाडू होता. तो खूप वेगवेगळ्या पोजिशनमध्ये फलंदाजी करायचा. मी आतापर्यंत जेवढेही फलंदाज पाहिले आहेत, त्यापैकी धोनी हा सर्वाधिक शक्तिशाली फलंदाज असल्याचे मला वाटते.”

चॅपेल पुढे म्हणाले, “मला धोनीची श्रीलंकाविरुद्धची १८३ धावांची खेळी अजूनही आठवण आहे. त्यापुढील सामना पुण्यात होणार होता. तेव्हा मी धोनीला म्हणालो होतो की, तू प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारण्याऐवजी शॉटला खालून का खेळत नाहीस? पुढील सामन्यात भारतीय संघाला २६१ धावांचे आव्हान पूर्ण करायचे होते.”

“अशात धोनी नेहमीप्रमाणे फलंदाजी न करता एकदम उलट्या शैलीत खेळत होता. शेवटी आम्हाला जिंकण्यासाठी २० धाावंची आवश्यकता होती आणि धोनीने मला षटकार मारु का नको? हे विचारले होते. त्यावर मी त्याला नकार दिला होता.  मी त्याला म्हणालो होतो की, तेव्हापर्यंत षटकार नको मारु जेव्हापर्यंत आपण आव्हानाची बरोबरी करत नाही.”

“ते काहीही असो, पण धोनी हा खूप दमदार फलंदाज आहे. त्याने क्रिकेटपटू आणि कर्णधार या दोन्हीही भूमिका खूप चांगल्या रितिने पार पाडल्या आहेत. कदाचित त्याच्या या यशामुळेच त्याचे कोटींच्या संख्येत चाहते आहेत. शिवाय त्याच्या निवृत्तीची गोष्ट ऐकताच त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू येतात,” असेही चॅपेल बोलताना म्हणाले.

२००५मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात हा किस्सा घडला होता. त्यावेळी धोनीने नाबाद ४५ धावा करत संघाला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

IPL नाही म्हणून काय झाले, आता होणार IPLपेक्षाही वेगवान लीग; तीदेखील लाॅकडाऊनमध्ये

ते दृष्य पाहुन केविन पीटरसनला आला राग, म्हणाला निव्वळ मुर्खपणा आहे

बलात्कारासारखे गंभीर आरोप झालेले जगातील ५ महान क्रिकेटपटू, एक नाव आहे…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---