आत्तापर्यंत इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात १३ संघ खेळले आहेत. पण त्यातील आता केवळ ८ संघ सक्रिय आहेत. तर ५ संघ आता आयपीएलमध्ये काही काळासाठीच होते.
सक्रिय असणाऱ्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स या ८ संघांचा समावेश होता. तर डेक्कन चार्जर्स, पुणे वॉरियर्स इंडिंया, रायझिंग पुणे सुपर जायंट्स, गुजराज लायन्स आणि कोची टस्कर्स केरला हे ५ संघ काही काळासाठी आयपीएलमध्ये खेळले.
या सर्व संघांना त्यांच्या संघात असलेल्या खेळाडूंसाठी मोठा खर्च प्रत्येकवर्षी उचलावा लागतो. यात खेळाडूंच्या रहाण्याचा, खाण्या-पिण्याचा खर्चतर असोतच पण त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूसाठी ठरल्याप्रमाणे प्रत्येकवर्षी रक्कम मोजावी लागते.
आत्तापर्यंत खेळाडूंच्या वेतनासाठी सर्वाधिक खर्च रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने केला आहे. २००८ पासून आयपीएलचा भाग असणाऱ्या बेंगलोर संघाचा आत्तापर्यंत एकूण वेतनचा खर्च ७,३४०,०७५,५०० रुपये आहे.
त्याच्यापाठोपाठ सर्वाधिक वेतन खर्च असणाऱ्या आयपीएल संघामध्ये दुसऱ्या क्रमांकावर ४ वेळचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स आहे. त्यांचा एकूण वेतन खर्च ७,११६,४८०,१५० रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता सहसंघमालक असलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ आहे. कोलताचा वेतन खर्च ६,८६९,९७३,६५० रुपये आहे.
तसेच चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स (आधीचे नाव दिल्ली डेअरडेविल्स) आणि किंग्स इलेव्हन पंजाब आहे. दिल्लीचा वेतन खर्च ६,६१४,६०८,४२२ रुपये इतका आहे. तर पंजाबचा ६,२७५,६१७,५४३ रुपये इतका आहे.
विशेष म्हणजे सर्वाधिक वेतन खर्च असणाऱ्या पहिल्या ५ आयपीएल संघामध्ये बेंगलोर, दिल्ली आणि पंजाब हे असे ३ संघ आहेत जे आयपीएलचा प्रत्येक मोसम खेळले आहेत. पण त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
सर्वाधिक वेतन खर्च असणारे आयपीएल संघ –
७,३४०,०७५,५०० रुपये- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
७,११६,४८०,१५० रुपये – मुंबई इंडियन्स
६,८६९,९७३,६५० रुपये – कोलकाता नाईट रायडर्स
६,६१४,६०८,४२२ रुपये – दिल्ली कॅपिटल्स
६,२७५,६१७,५४३ रुपये – किंग्स इलेव्हन पंजाब
5,864,897,500 रुपये – चेन्नई सुपर किंग्स
४,७५८,७७२,८०० रपये – सनरायझर्स हैद्राबाद
४,६२९,४२९,९५० रुपये – राजस्थान रॉयल्स
१,४६३,९८२,१०० रुपये – डेक्कन चार्जर्स
१,४४३,४४५,४२८ रुपये – पुणे वॉरियर्स इंडिंया
१,२७५,५००,००० रुपये- रायझिंग पुणे सुपर जायंट्स
१,००१,०००,००० रुपये – गुजराज लायन्स
३८५,3४०,००० रुपये – कोची टस्कर्स केरला