पुणे । महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटना व आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने मुलींच्या ज्युनियर गटाच्या शारदा – गजानन चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन आझम कॅम्पस येथे १२ ते १४ मे दरम्यान करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गजानन पंडित यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष अण्णा थोरात उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे शहर, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड, मुंबई, जळगांव, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, सांगली, लातूर, बीड, औरंगाबाद असे २५ संघ सहभागी होत आहेत.
सुमारे ४५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विजेत्या, उपविजेत्या व तिसऱ्या क्रमांक मिळविणाऱ्या संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. याबरोबरीने बेस्ट बॅटर, बेस्ट पीचर व बेस्ट कॅचर असे तीन वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन १२ मे रोजी सकाळी ११.३० वाजता सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदीश मुळीक, एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अण्णा थोरात यांनी दिली.
दिवसातील महत्त्वाच्या बातम्या-
–रोहित शर्मा आणि इडन गार्डनचे नाते काही खास!
-एका सामन्यासाठी का बदलणार राजस्थान राॅयल्स जर्सीचा रंग?
–टी२०मध्ये कोहलीपेक्षा एबी डिव्हिलियर्सच भारी, माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
-गोलंदाज असुनही टी२०मध्ये त्याने सर्व क्रमांकावर फलंदाजी केलीय!