आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये प्लेऑफमध्ये (playoffs) पोहोचणारे 4 संघ निश्चित झाले आहेत. ज्यामध्ये गुजरात टायटन्स (GT), रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू(RCB), पंजाब किंग्स (PBKS) आणि मुंबई इंडियन्स संघ सामील आहेत. तसेच सध्या टॉप- 2 संघासाठी या 4 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी आता गुजरात टायटन्सला (gaujrat Titans) झटका बसताना दिसत आहे. लखनऊकडून पराभूत झाल्यानंतर आता गुजरातचा संघ टॉप-2 संघांमधून बाहेर होऊ शकतो जाणून घ्या समीकरण.
22 मे रोजी आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघात सामना खेळण्यात आला, या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच धुवा उडवला. लखनऊने 235 धावा केल्या. ज्यामध्ये मिचेल मार्शने (Mitchell Marsh) 117 धावा आणि निकोलस पुरणने (nicolas pooran) नाबाद 57 धावांची पारी खेळली. नंतर धावांचा पाठलाग करताना गुजरात संघ 202 धावांवर ऑल आऊट झाला.
लखनऊकडून पराभूत झाल्यानंतर गुजरात टॉप- 2 संघांमधून बाहेर पडू शकतो. गुजरातकडे एक सामना शिल्लक आहे, जो त्यांना चेन्नई(CSK) विरुद्ध खेळायचा आहे. जर गुजरातने हा सामना जिंकला तर त्यांचे 20 गुण होतील. तसेच दुसरीकडे पंजाब किंग्स(PBKS) आणि आरसीबीकडे (RCB) सुद्धा 21-21 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.
सध्या पॉईंट्स टेबलमध्ये (points table) गुजरात 18 गुणांनी पहिल्या स्थानावर तसेच आरसीबी 17 गुणांनी दुसऱ्या स्थानावर आणि पंजाब 17 गुणांनी तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबी आणि पंजाबचे 2-2 सामने उरले आहेत. आरसीबीला त्यांचे 2 सामने सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघांशी खेळायचे आहेत. जर आरसीबीने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 21 गुण होतील.
याशिवाय पंजाब किंग्सला त्यांचे पुढचे 2 सामने दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि मुंबई इंडियन्स (MI) संघांशी खेळायचे आहेत, जर पंजाबने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे सुद्धा 21 गुण होतील. अशा परिस्थितीत पंजाब आणि आरसीबी गुजरातच्या पुढे जाऊन टॉप- 2 संघांमध्ये पोहोचेल आणि जो संघ टॉप-2 मध्ये राहील, त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील.






