---Advertisement---

GT vs LSG: ‘हा’ खेळाडू ठरला गुजरातसाठी नाईटमेयर, क्षणात सामना फिरवला

On: शुक्रवार, मे 23, 2025 10:50 AM
---Advertisement---

आयपीएल 2025च्या 64व्या सामन्यात गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव केला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2025 च्या 64व्या सामन्यात, लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 गडी गमावून 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्स संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 202 धावा करू शकला.

टाॅस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 53 धावा केल्या. एडेन मार्कराम 24 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. साई किशोरने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर मैदानावर मिशेल मार्श नावाचं वादळ आलं. मार्शने शतकी खेळी करत गुजरातच्या गोलंदाजांना धो धो धुतलं. त्याने 64 चेंडूत 117 धावा केल्या. ज्यात त्याने 10 चाैकार 8 षटकार मारल्या.

शेवटी 18.2 षटकांत अर्शदने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर निकोलस पूरनने 27 चेंडूत 56 धावा करून नाबाद राहिला. कर्णधार रिषभ पंतने 6 चेंडूत 16 धावा केल्या. गुजरातकडून अर्शद, साई किशोरने 1-1 बळी घेतले.

236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरात टायटन्स संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी झाली. 16 चेंडूत 21 धावा काढल्यानंतर साई सुदर्शन बाद झाला. विल्यम ओरोर्केने त्याला बाद केले. त्यानंतर 20 चेंडूत 35 धावा काढल्यानंतर कर्णधार शुबमन गिल बाद झाला. जोस बटलरने 18 चेंडूत 33 धावा केल्या. शाहरुख आणि रदरफोर्ड यांनी चौथ्या विकेटसाठी 40 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. ज्यात रदरफोर्डने 22 चेंडूत 38 धावा केल्या. तर शाहरुखने 29 चेंडूत 57 धावा केल्या. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. लखनऊकडून विल्यम ओरोर्केने तीन, अवेश आणि आयुष बदोनीने 2-2 बळी घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---