आयपीएल 2025 मधील 64 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. हा रिषभ पंतच्या संघाने एकतर्फी जिंकला. टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना एलएसजीने मर्यादित 20 षटकात 2 गडी गमावून 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला 20 षटकात केवळ 202 धावा करता आल्या. आशाप्रकारे लखनऊने 33 धावांनी सामना जिंकला.
मिचेल मार्शच्या (117) शतकी तर निकोलस पुरनच्या (56) अर्धशतकी यांच्या खेळीच्या जोरावर लखनऊने गुजरात समोर 235 धावांचे लक्ष्य ठेवले. 236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुबमन गिल (20 चेंडूत 35) आणि साई सुदर्शन (16 चेंडूत 21) यांनी चांगली सुरुवात दिली. नंतर शाहरुख खान (29 चेंडूत 57) आणि रदरफोर्ड (22 चेंडूत 38) यांनी चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली, दरम्यान गुजरात लक्ष्याकडे आगेकूच करताना 17 व्या षटकात विल्यम ओरोर्केने 2 विकेट्स घेऊन लखनऊ सुपर जायंट्सला सामन्यात परत आणले. त्याने 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रदरफोर्डला तर शेवटच्या चेंडूवर राहुल तेवटियाला बाद केले.
Dominant with the bat ????
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
Clinical with the ball ????@LucknowIPL prevail in a run-fest and complete their double against table-toppers #GT ????
Scorecard ▶ https://t.co/NwAHcYJlcP #TATAIPL | #GTvLSG pic.twitter.com/VLbBcbzbGx
लखनऊकडून विल्यम ओरोर्केने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, त्याने 4 षटकात 27 धावा दिल्या. त्याच्याशिवाय अवेश खान आणि आयुष बदोनीने प्रत्येकी 2 बळी घेतले.






