पहिल्यांदाच इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या गुजरात टायटन्स या संघाने सर्वांनाच चकित केले. रविवारी (दि. २९ मे) या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्स संघावर ७ विकेट्सने विजय मिळवत ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सामन्यात संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना अपेक्षित आव्हान देण्यात अपयश आले. या हंगामात शतकांचा पाऊस पाडणाऱ्या जोस बटलर याचीही बॅट शांत राहिली. तो कमी धावांवर बाद झाल्यामुळे चांगलाच संतापला आणि मैदानातून बाहेर जाताना हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकताना दिसला.
या सामन्यात राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत १३० धावा चोपल्या होत्या. या धावा करताना जोस बटलर (Jos Buttler) याने ३९ धावा दिल्या. विशेष म्हणजे, या धावा कमी वाटत असल्या, तरी या सामन्यात राजस्थान संघासाठी कोणत्याही खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा होत्या. बटलरव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २५ धावांचा आकडाही पार करता आला नाही. स्वत: जास्त धावा करूनही बटलर निराश दिसला. त्याचा हा राग मैदानातून बाहेर जाताना कॅमेऱ्यात कैद झाला.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरप्रमाणेच या अंतिम सामन्यातही बटलर खेळताना दिसला. मात्र, हार्दिक पांड्याने ३९ धावा करत राजस्थानला मोठा धक्का दिला. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध शतक झळकावणारा जोस बटलर अंतिम फेरीत संघर्ष करताना दिसला.
राजस्थान रॉयल्सचा संघ आधीच एका बाजूने सतत पडणाऱ्या विकेट्समुळे दडपणाखाली होता. देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात बटलरही बाद झाला आणि त्यामुळे तो आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने आपले ग्लोव्हज आणि हेल्मेट डगआऊटजवळ फेकले, यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/SoniGup46462554/status/1530940117019693056?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530940117019693056%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.sportstiger.com%2Fwatch-angry-jos-buttler-throws-helmet-and-gloves-after-getting-out-in-ipl-2022-final%2F
राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी कॅप) पटकावली. त्याने १७ सामने खेळताना ५७.५३च्या सरासरीने ८६३ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ शतके आणि ४ अर्धशतकेही झळकावली आहेत. या धावा करताना त्याने ४५ षटकार आणि ८३ चौकारही मारले आहेत. विशेष म्हणजे, तो या हंगामात सर्वाधिक धावा करणाराही फलंदाजही ठरला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार हार्दिकचेही मास्टर धोनीच्या पावलावर पाऊल, ट्रॉफी जिंकल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम
Video: आयपीएल जेतेपद पटकावलेल्या ‘कॅप्टन’ हार्दिकसाठी पत्नी भावुक, मग पतीनेही केलं सांत्वन
Video: गुजरातने आयपीएल ट्रॉफी जिंकताच बीसीसीआयचे सचिव शहांच्या आनंदाला उधाण, लागले नाचू