---Advertisement---

GT vs SRH: प्रसिध्द-सिराज चमकले, गुजरातचा हैदराबादवर सहज विजय!

---Advertisement---

आयपीएल 2025च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सामन्यात गुजरातने ऑलराऊंड कामगिरी केली. अहमदाबाद, गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पहिल्या डावात खेळताना गुजरातने 224 धावांचा मोठा धावसंख्या उभारला. प्रत्युत्तरात, हैदराबाद संघ निर्धारित 20 षटकात फक्त 186 धावाच करू शकला.

सनरायझर्स हैदराबादला 225 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला जलद सुरुवात दिली, परंतु हेड 20 धावांवर बाद झाला. अभिषेक वेगळ्या लयीत दिसला, त्याने 74 धावांची वादळी खेळी खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला ईशान किशन देखील फक्त १३ धावा काढून बाद झाला.

अभिषेकने 41चेंडूत 74 धावांची दमदार खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याने हेनरिक क्लासेनसोबत 57 धावांची भागीदारीही केली. जिथे संघाला क्लासेनकडून मोठी आणि वेगवान खेळी अपेक्षित होती, तिथे क्लासेन फक्त 23 धावा काढून बाद झाला. सलग विकेट गेल्याने आवश्यक धावगती इतकी वाढली होती की हैदराबादच्या पुढील फलंदाजांना 225 धावांचे लक्ष्य गाठणे अशक्य झाले. ज्यामुळे संघाचा 38 धाावांनी पराभव झाला.

गुजरात टायटन्सकडून प्रसिध्द कृष्णाने शानदार कामगिरी केली. त्याने मर्यादित 4 षटकात 19 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने विस्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड व हेनरिक क्लासेन यांना माघारी पाठवले. त्याच्याशिवाय मोहम्मद सिराजने देखील 2 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---