इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १६वा सामना शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना पंजाब संघाचा हंगामातील चौथा सामना असणार आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय, तर १ सामन्यात पराभव मिळाला आहे. दुसरीकडे गुजरात संघाने या हंगामात खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात गुजरात संघ सलग तिसरा विजय मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. (GT won toss and opt to field first)
तत्पूर्वी, भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघात नाणेफेक पार पडली. यावेळी गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी संघात एक बदल पाहायला मिळाला. वरुण ऍरॉनला विजय शंकरच्या जागी संधी मिळाली आहे. तसेच, दोन खेळाडू आयपीएल पदार्पण करत आहेत. ते दोन खेळाडू म्हणजे, साई सुदर्शन आणि दर्शन नळकांडे होय.
दुसरीकडे दुसरीकडे पंजाब संघात फक्त एक बदल आहे. विस्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो या आयपीएलमध्ये पंजाबच्या ताफ्यात सामील झाला आहे. तो भानुका राजपक्षेच्या जागी संघात खेळेल.
असे आहेत संघ
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा