भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेत खेळासाठी उतरला तर तो आपल्या खेळभावनेने उपस्थितांची मने जिंकून घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. तशाचप्रकारे आपल्या संघासोबत देशाचे इतर खेळात प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात देखील भारतीय खेळाडू पुढे दिसतात. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना आणि फलंदाज जेमिमाह रॉड्रीगेज यांनी इतर खेळातील खेळाडूंना पदके जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अशीच काहिशी गोष्ट आज भारतीय पुरुष हॉकी संघाकडून पाहायला मिळाली. ज्याने फक्त भारतच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
There is joy and enjoyment in the air! 🥉🤩
Our Bronze medallists return to a well-deserved welcome from our Indian Men's team! 🎊#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/S2Zo1nnJAk
— Hockey India (@TheHockeyIndia) August 7, 2022
भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी (७ ऑगस्ट) न्यूझीलंड संघाचा शूटआऊटमध्ये २-१ने पराभव करत भारतासाठी कांस्य पदक मिळवलं. यानंतर भारतीय महिला हॉकी संघ मैदानाबाहेर आला त्यावेळी पुरुषांचा हॉकी संघ त्यांच्या स्वागतासाठी खेळाडू दोन्ही बाजूंना रांगा करून टाळ्यांने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी थांबले होते. ज्यावेळी महिला संघ तिथे आला त्यावेळी पुरुष संघाने एकत्रित टाळ्यांचा वर्षाव सुरू केला आणि महिला संघाचे कांस्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पुरुष आणि महिला संघातील एकीचे दर्शन संपूर्ण जगाला घडले. शिवाय या साध्या कृतीतून भारतीय संघातील खेळभावनेचे दर्शनही घडले. या प्रसंगावरून क्रिकेटमधील ‘गार्ड ऑफ हॉनर’ची आठवण तुम्हालाही झाल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, भारतीय महिला हॉकीने १६ वर्षानंतर कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकले आहे. याआधी २००२मध्ये मॅनचेस्टर येथे झालेल्या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक आणि २००६मध्ये मेलबर्न येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले होते. भारताचे २०२२च्या या स्पर्धेतील हे ४१वे पदक ठरले आहे. आतापर्यंत भारताने १५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १७ कांस्य पदक जिंकले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीप सिंगला टी२० विश्वचषकासाठी संघात घ्याच! माजी प्रशिक्षक शास्त्री गुरूजींचा टीम इंडियाला सल्ला
‘…म्हणून मला टी२० आणि कसोटी संघात घेत नाहीत!’, संघनिवडीवरून आता थेट शिखर धवनने सोडले मौन