---Advertisement---

‘…म्हणून मला टी२० आणि कसोटी संघात घेत नाहीत!’, संघनिवडीवरून आता थेट शिखर धवनने सोडले मौन

On: रविवार, ऑगस्ट 7, 2022 6:32 PM
Shikhar-Dhawan-Rahul-Dravid
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनने टी-२० आणि कसोटी संघात संधी न मिळाल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धवन बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही फॉरमॅटमधून बाहेर आहे. तो म्हणतो की, “निवडकर्त्यांच्या या निर्णयाने तो निराश नाही आणि कदाचित ही त्याची वेळ नाही.”

गेल्या वर्षी श्रीलंका मालिकेसाठी शिखर धवनला वनडे आणि टी-२० मालिकेचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तो भारताकडून टी-२० सामने खेळलेला नाही. त्याला टी-२० संघात संधी दिली जात नाही. त्याचबरोबर आता त्याचा कसोटी संघात समावेश केला जात नाही. त्याने शेवटचा कसोटी सामना सप्टेंबर २०१८मध्ये खेळला होता.

“खरे सांगायचे तर, मी यामुळे निराश नाही. माझ्या मते, प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि कदाचित ती माझी वेळ नाही. कदाचित माझ्यामध्ये काहीतरी उणीव आहे आणि मी संघाला आवश्यक ते करू शकत नाही. मी सध्या खूप चांगल्या जागेत आहे आणि माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. जेव्हा मी आयपीएलमध्ये खेळतो तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. जर मी तिथे चांगली कामगिरी केली तर मला संधी मिळाली असती. बाकी सर्व काही निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हाही संधी मिळेल तेव्हा मी तयार असतो.” असं म्हणत भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवनने या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

दरम्यान, याआधी विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी शिखर धवनला टी-२० सामन्यात संधी न मिळाल्याने मोठी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “शिखर धवनला टी-२० मध्ये निवडकर्त्यांनी फार लवकर दुर्लक्ष केले.” मात्र, त्यांच्या या प्रत्किरयेवर शिखर धवनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय संघात सामील न करून घेतल्यामुळे शिखरने निवडकर्त्यांवर निशाणा साधण्याऐवजी आपल्या कामगिरीत काहीतरी त्रुटी असू शकतात असे प्रांजळ मत व्यक्त केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

CWG: बॅडमिंटनमध्ये ‘कभी खुशी कभी गम’! युवा लक्ष्य फायनलमध्ये; श्रीकांतच्या पदरी निराशा

CWG 2022: वडिलांनी टाकली नोकरी संकटात! नीतूनं गोल्ड मेडल मिळवत साकारले स्वप्न

लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवशी दिपक चाहरला पत्नीने दिल्या खास शुभेच्छा! पोस्ट शेअर करत लिहीले, ‘HBD…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---