एमएस धोनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. धोनीची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही वर्षांपूर्वी त्याने निवृत्ती घेतली. पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनी अजूनही खेळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात धोनीने नेतृत्वगुणांवर भाष्य केले. याठिकाणी धोनी जे बोलला, तर सध्या क्रिकेट खेळत असलेल्या इतर कर्णधारांच्या कामी येऊ शकते.
एमएस धोनी () नेहमी फिनिशरच्या रुपात खेळत आला. त्याने भारतीय संघ आणि चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी अनेक सामन्यांचा शेवट केला असून संघाला विजय मिळवून दिला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनीच्याच नेतृत्वात पाच वेळा सीएसकेने विजेतेपद जिंकले आहे.
धोनीने नुकताच सिंग आयडी कंपनीच्या कार्यक्रमाला उफस्थित राहिला होता. यावेळी त्याने नेतृत्वगुणांविषयी खास प्रतिक्रिया दिली. भारताचा माजी कर्णधार म्हणाला, “कोणत्याही खेळाडूला मिळणारा मान त्याच्या पदावरून होत नाही, तर त्याच्या कृतीवरून त्याचा मान ठरतो. त्यामुळे मान मिळावा, यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाहीये. तो कमावला पाहिजे. कारण हे खूप स्वाभाविक आहे. एकदा तुमच्यात ती निष्ठा आली, तर संघाचे प्रदर्शन देखील तसेच होते.”
धोनी पुढे असेही म्हणाला की, “मला नेहमीच वाटायचे की, संघाचे नेतृत्वत करताना तुम्हाला सन्मान मिळवणे गरजेचे आहे. कारण हा मान त्या खुर्ची किंवा पदासोबत येत नाही. हे सर्व तुमच्या कृतीतून येते. कधी-कधी संघ तुमच्यावर विश्वास दाखवतो, पण प्रत्यक्षात तुम्हीच पहिले व्यक्ती असता, जो स्वतःवर विश्वास दाखवत नाही.”
धोनीने पुढे असेही सांगितले की, कर्णधाराला ड्रेसिंग रुममधील प्रत्येक खेळाडूची ताकद आणि कमजोरी समजून घ्यायची असते. काही खेळाडूंना दबावाद खेळायला आवडते, तर काहींना ते आवडत नाही. कर्णधाराने या गोष्टी समजून घेतल्या तर खेळाडूंमध्ये असलेल्या कमीवर काम करता येते. या गोष्टी खेळाडूंना आत्मविश्वास देतात आणि स्वतःबाबतचा अविश्वास दूक करण्यासाठीही मदत करतात. (Guidance received from MS Dhoni on leadership, useful information for all captains including Rohit)
महत्वाच्या बातम्या –
विराट-अय्यर बाहेर, राहुल-जडेजाची फिटनेस पाहून ठरणार प्लेइंग इलेव्हन; अंतिम 11साठी हे खेळाडू दावेदार
ICC U19 विश्वचषक ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ च्या रेसमध्ये 3 भारतीय, पहा संपूर्ण यादी…