---Advertisement---

‘तुम्ही या विजयाचे खरे हक्कदार आमदार जी’, पत्नीच्या विजयावर जडेजाकडून स्तुतीसुमने; पाहा ट्वीट

On: शुक्रवार, डिसेंबर 9, 2022 4:15 PM
Ravindra-Jadeja-And-Rivaba-Jadeja
---Advertisement---

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 पार पडली. यामध्ये भाजपने गुजरातमध्ये रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळवले. यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा ही भाजपच्या तिकीटावर जामनगर उत्तर मतदारसंघातून निवडून आली. पत्नीच्या विजयानंतर जडेजा भलताच खुश दिसला. त्याने रिवाबाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्याने यामध्ये पत्नीचे अभिनंदन करत जामनगरमधील जनतेचेही आभार मानले.

जडेजाने शेअर केला फोटो
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने ट्वीट करत लिहिले की, “नमस्कार, आमदार. तुम्ही या विजयाचे खरेखुरे हक्कदार आहात. जामनगरची जनता दिसली. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आशापुरा माताला विनंती आहे की, जामनगरमधील कामं चांगल्याप्रकारे होतील. जय माताजी.”

https://twitter.com/imjadeja/status/1601074978077970433?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1601074978077970433%7Ctwgr%5Eaf8c69e7789934628734eaaab80df2033a4e73a1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fcricket%2Fcricket-news%2Fgujarat-assembly-election-2022-ravindra-jadeja-post-for-wife-rivaba-after-win-from-jamnagar-north-seat-bjp

जडेजाने निवडणूक प्रचारातही घेतलेला भाग
खरं तर, जडेजा मागील काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. आशिया चषक म्हणजेच सप्टेंबरमध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यानंतर तो दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला. असे असले, तरीही तो पत्नीला विजयी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली. त्याने निवडणूक प्रचारात भाग घेतला आणि प्रचार यात्रेतही हजेरी लावली.

जडेजा आहे दुखापतग्रस्त
मागील काही महिन्यांपासून जडेजा भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे मालिकेसाठी संघात सामील केले गेले होते. मात्र, तो फिट नसल्यामुळे त्याला संघातून बाहेर काढले. जडेजा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात सामील आहे. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, तो कसोटी मालिकाही खेळणार नाहीये. त्याच्या जागी भारत अ संघाचा डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार याला संधी दिली जाऊ शकते.

जडेजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
भारतीय संघाकडून जडेजाने 60 कसोटी, 171 वनडे आणि 64 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 36.57च्या सरासरीने 2523 धावा, वनडेत 32.63च्या सरासरीने 2447 धावा आणि टी20त 124.52च्या स्ट्राईक रेटने 457 धावा चोपल्या आहेत. कसोटीत जडेजाने 242 विकेट्स, वनडेत 189 विकेट्स आणि टी20त 51 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 210 आयपीएल सामने खेळताना 2502 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने या स्पर्धेत 132 विकेट्सही घेतल्या आहेत. (gujarat assembly election 2022 cricketer ravindra jadeja post for wife rivaba after win from jamnagar north seat bjp)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: ‘म्हातारा’ म्हणणाऱ्या कर्णधार बाबरला शादाब खानचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाला, ‘आता आम्ही’
इंग्लंडला पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज स्वप्नातही आठवेल! पदार्पणाच्या सामन्यातच अर्धा संघ धाडला तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---