---Advertisement---

7 षटकार, 86 चौकार अन् 498 धावा! गुजरातच्या खेळाडूचा बॅटनं कहर

On: बुधवार, सप्टेंबर 25, 2024 12:13 PM
---Advertisement---

गुजरातच्या एका खेळाडूनं क्रिकेटच्या मैदानावर कहर केला आहे. 18 वर्षीय द्रोण देसाईनं दिवाण बल्लूभाई कप अंडर-19 मल्टीडे टूर्नामेंटमध्ये 498 धावा करून रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं.

मंगळवारी (24 सप्टेंबर) द्रोणनं गांधीनगरमधील शिवाय क्रिकेट मैदानावर जेएल इंग्लिश स्कूल विरुद्ध सेंट झेवियर्स (लोयोला) शाळेसाठी ही शानदार खेळी खेळली. द्रोण देसाईनं आपल्या मॅरेथॉन खेळीत 320 चेंडूंचा सामना केला, ज्यात 7 षटकार आणि तब्बल 86 चौकारांचा समावेश होता. गुजरात क्रिकेट असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट अहमदाबाद’ द्वारे ही वार्षिक स्पर्धा आयोजित केली जाते.

आपण या विक्रमाच्या इतक्या जवळ आहोत हे माहीत नसल्यानं द्रोण देसाईनं सामन्यानंतर बोलताना सांगितलं. देसाई म्हणाला, “मैदानात स्कोअरबोर्ड नव्हता आणि माझ्या संघानं मला सांगितलं नाही की मी 498 धावांवर फलंदाजी करत आहे. मी स्ट्रोक खेळलो आणि आऊट झालो, पण मला आनंद आहे की मी तेवढ्या धावा करू शकलो.”

द्रोण देसाईच्या खेळीच्या जोरावर त्याच्या संघानं जेएल इंग्लिश स्कूलवर एक डाव आणि 712 धावांनी विजय मिळवला. आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा देसाई गुजरात अंडर-14 संघाकडून खेळला असून आता त्याला राज्याच्या अंडर-19 संघात स्थान मिळण्याची आशा आहे. सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहिल्यानंतर त्याला खेळण्याची प्रेरणा मिळाल्याचं तो सांगतो.

द्रोण देसाई हा एवढी मोठी धावसंख्या करणारा देशातील सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी मुंबईचा प्रणव धनावडे (नाबाद 1009), पृथ्वी शॉ (546), डॉ. हवेवाला (515), चमनलाल (नाबाद 506) आणि अरमान जाफर (498) हे एका डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत.

प्रणव धनावडेनं जानेवारी 2016 मध्ये भंडारी चषकात केसी गांधी स्कूलकडून खेळताना 327 चेंडूत 129 चौकार आणि 59 षटकारांच्या मदतीनं नाबाद 1009 धावा केल्या होत्या. शालेय स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे.

हेही वाचा – 

रणजी ट्रॉफी 2024-25; विराट कोहलीचे 5 वर्षात प्रथमच दिल्लीच्या संभाव्य संघात नाव!
AUS vs ENG: 304 धावा करूनही कांगारू हरले, पाहा ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी ‘इंग्लंड’ची मोठी खेळी; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची निवृत्ती मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---