Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

WPL 2023 । पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सला मोठी झटका, कर्णधार बेथ मुनीची दुखापत चिंताजनक

WPL 2023 । पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सला मोठी झटका, कर्णधार बेथ मुनीची दुखापत चिंताजनक

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Beth Mooney

Photo Courtesy: Twitter/Aneesh_98


मुंबई इंडियन्स महिला आणि गुजरात जायंट्स महिला यांच्यातील सामना चांगलार रंजर राहिला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने 143 धावांनी हा सामना नावावर केला आणि डब्ल्यूपीएलची सुरुवात गोड केली. दुसरीकडे गुजरात जायंट्सला मात्र स्पर्धेतील या पहिल्याच सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सोपतच त्यांची कर्णधार बेथ मुनी हिला दुखापत झाल्यानंतर संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सामना सुरू होण्यापूर्वी गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनी (Beth Mooney ) हिने नाणेफेक जिंकली आणि मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईने पहिल्यांदाच फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभी केली, जी गुजरात संघ प्रत्युत्तरात गाठू शकला नाही. गुजरातची फलंदाजी आल्यानंतर सभिनेनी मेघणा (Sabbhineni Meghana) आणि बेथ मुनी यांनी डावाची सुरुवात केली. पण मुनीने एकही धाव केली नसतानाच तिला तंबूत परतावे लागले. गुजरातच्या डावातील चौथ्याच चेंडूवर मुनीच्या घोट्याला दुखापत झाली. एकाद दुखापत झाल्यानंतर मात्र वेदना थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. अशात तिला दोन खेळाडूंनी खांदा देत मैदानाबाहेर नेले. मैदानात बाहेर जाताना तिला चालता येत नसल्याचे दिसले.

बेथ मुनी पहिल्या डावात एकही धाव न करता तंबूत परतल्यामुळे संघाचा चांगलाच तोटा झाल्याचे पाहायला मिळाले. गुजरात जायंट्सने 15.1 षटकात अवघ्या 64 धावा करून सर्वच्या सर्व विकेट्स गमावल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने मर्यादित 20 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 207 धावा केल्या होत्या. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर (65), हेली मॅथ्यूज (47), आणि अमेलिया केर (45) यांनी संघासाठी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. तसेच गोलंदाजी विभागात मुंबईसाठी सायका इशाक () हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या गुजरातला स्वस्तात गुंडाळले. हरमनप्रीत कौरला तिच्या वादळी फलंदाजीसाठी सामनावीर निवडण्यात आले.

Beth Mooney has twisted her ankle and has walked off the field.

Hope she recovers soon🙌#BethMooney #WPL2023 #GGvMI pic.twitter.com/AfzruBqHjI

— Aneesh (@Aneesh_98) March 4, 2023

दरम्यान, गुजरात जायंट्सला डब्ल्यूपीएलमधील त्यांचा पुढचा सामना रविवारी (5 मार्च) रात्री यूपी वॉरिअर्स संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी कर्णधार बेथ मुनी फिट असणे गुजरात संघासाठी महत्वाचे असेल. तत्पूर्वी रविवारी दुपारी आरसीबी महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यातील लढत चाहत्यांना पाहायला मिळेल.
(Gujarat Giants captain Beth Mooney was injured in the first match of WPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची, एक नजर टाकाच
डब्ल्यूपीएलच्या उद्घाटन सामन्यात हरमनप्रीतचा धमाका, सलग सात चेंडूत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा 

 


Next Post
Sachin-Tendulkar-And-Wasim-Akram

क्रिकेटप्रेमींसाठी खास आर्टिकल: 'ती' अजरामर मॅच, ज्यात भारत-पाकिस्तानचे क्रिकेटर खेळलेले एकत्र

Courtney-Walsh

विंडीजच्या दिग्गजाने मनाचा मोठेपणा दाखवताच हुकलेली सेमीफायनल, पाकिस्तानी जनरलकडून मिळालं होतं गिफ्ट

James-Taylor

अंपायरच्या चुकीमुळे वर्ल्डकप सेंच्युरीला मुकलेला 'हा' खेळाडू, आजारपणामुळे 26व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143