महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला सामना गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात भारतीय प्रमाणवेळेनुसार 7.30 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक गुजरात जायंट्स संघाची कर्णधार बेथ मूनी हिने जिंकली असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हरमनप्रीत काय म्हणाली?
नाणेफेकीवेळी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) म्हणाली की, “आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे. आपण सर्वजण या क्षणाचा आनंद घेत आहोत. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी शानदार आहे. मात्र, गोलंदाजांसाठीही फायदेशीर आहे. आमच्या सघात अनेक युवा खेळाडू आहे, आता मैदानावर त्या कशाप्रकारे त्यांच्या खेळीने सर्वांना प्रभावित करतात, हे पाहण्यासाठी आम्ही खूपच उत्साही आहोत.”
पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स महिला-
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
Take a look at the Playing XIs of the two teams 👌👌
Who are you rooting for – 🧡 or 💙 #TATAWPL pic.twitter.com/mKYOHEqavZ
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 4, 2023
गुजरात जायंट्स महिला-
बेथ मुनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सब्भिनेनी मेघना, हरलीन देओल, ऍशले गार्डनर, ऍनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! WPL हंगामाला सुरुवात होण्याआधीच वादाची ठिणगी! अदानींच्या संघातून दिग्गज बाहेर, कारण संताप आणणारे
डब्ल्यूपीएलमधील विदेशी कर्णधारांमुळे भारतीय खेळाडू निराज! माजी दिग्गजासमोर व्यक्त केली खंत