---Advertisement---

LLC 2024; गब्बरच्या संघाचा दारूण पराभव; दिनेश कार्तिकच्या सदर्न सुपर स्टार्सचा दबदबा

On: मंगळवार, सप्टेंबर 24, 2024 10:54 AM
---Advertisement---

लिजेंड्स लीग क्रिकेट LLC 2024 च्या चौथ्या सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ गुजरात ग्रेट्सला पराभवाचा सामना करावा लागला. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील सदर्न सुपर स्टार्सकडून गुजरात ग्रेट्सचा 26 धावांनी पराभव झाला. गुजरात संघासाठी कर्णधार शिखर धवनने अर्धशतक झळकावले. त्याआधी मनन शर्माने देखील 6 बळी घेतले. परंतु दोघांची दमदार कामगिरी व्यर्थ गेली. कारण स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात संघाचा पराभव झाला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरात ग्रेट्सचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशाप्रकारे सदर्न सुपर स्टार्सने 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 144 धावा केल्या होत्या. गुजरातकडून गोलंदाजी करताना मनन शर्माने 6 विकेट्स घेत 4 षटकात 17 धावा दिल्या. दिनेश कार्तिकच्या संघाकडून चतुरंगा डी सिल्वाने अवघ्या 28 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.

145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाला चांगली सुरुवात झाली. मात्र त्यानंतर संघ ढेपाळला. गुजरात ग्रेट्सची पहिली विकेट 7.1 षटकात एकूण 63 धावांवर पडली. परंतु संपूर्ण संघाला 20 षटके खेळून 9 विकेट गमावून केवळ 118 धावांपर्यंत मजल मारता आली. शिखर धवनने 48 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी खेळली. पण त्याला संघाला विजयापर्यंत पोहचवता आले नाही.

पहिल्या डावात 6 बळी घेतल्यानंतर मनन शर्माने फलंदाजीचा सर्वोत्तम प्रयत्न केला आणि 4 चेंडूत 10 धावा केल्या. मात्र तो धावबाद झाला. तर सलामीवीर मॉर्न व्हॅन विकने 15 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. दक्षिणेकडून पवन नेगीने 3 बळी घेतले.

हेही वाचा-

In the air…Sreesanth takes it.., जेव्हा टीम इंडिया पहिल्यांदा टी20 वर्ल्ड चॅम्पियन बनली होती!
कानपूर कसोटीतही सर्फराज खानला संधी नाही! मोठे अपडेट समोर
एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग करण्यासाठी पंचांना किती पगार मिळतो?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---