आयपीएल 2023 मध्ये हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघ सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहे. गुजरातने सातत्यपूर्ण कामगिरी करत गुणतालिकेतील आपले अव्वलस्थान कायम राखलेय. त्याचवेळी त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कनिष्ठ क्रिकेट खेळत असताना आपल्याला ऍटीट्युडचे कारण देत संघाबाहेर केले असल्याचा खुलासा देखील त्याने केला.
हार्दिक मागील सात वर्षांपासून भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. मागील वर्षी त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. मात्र, एक वेळ अशी होती जेव्हा त्याला त्याच्या स्वभावामुळे संघा बाहेर व्हावे लागले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“मी 17 वर्षाखालील संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी करूनही माझी संघात निवड झाली नव्हती. त्यावेळी मी 800 च्या आसपास धावा बनवलेल्या. मात्र, असे असताना देखील 300 धावा करणाऱ्या खेळाडूला संधी दिली गेलेली. त्यावेळी कारण देताना म्हटले होते की माझा ऍटीट्यूड चांगला नाही. मात्र, माझ्यासाठी स्वतःचा आदर महत्त्वाचा आहे. तुम्ही मला आदर दिला तर मी तुम्हाला आदर नक्कीच देईल.”
हार्दिकने या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. आपल्या कारकिर्दीत भाऊ कृणाल याचे महत्त्वाचे योगदान असल्याचे त्याने म्हटले. तसेच त्याने आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन व पाठिंबा दिल्याचे त्याने सांगितले.
हार्दिक मागील वर्षापासून गुजरातचे नेतृत्व करत आहे. पहिल्याच हंगामात त्याने आपल्या नेतृत्वात गुजरातला आयपीएल विजेतेपद पटकावून दिले. त्यानंतर या हंगामात देखील 10 पैकी 7 सामने जिंकून गुजरातने प्ले ऑफच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
(Gujarat Titans Captain Hardik Pandya Said He Is Dropped From U17 Side Due To Attitude Problem)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘गोल्डन बॉय’ नीरजने पुन्हा उंचावली भारताची मान! डायमंड लीगमध्ये फेकला विक्रमी भाला
राजस्थानसाठी डोईजड ठरतोय ‘टॅलेंटेड’ पराग! इतक्या संधी मिळूनही देऊ शकला नाही संघासाठी योगदान