---Advertisement---

रैनाच्या चाहत्यांचा हार्टब्रेक! गुजरात टायटन्सने संघात सामील करून घेण्यास दिला स्पष्ट नकार

On: गुरूवार, मार्च 3, 2022 8:17 PM
RAINA
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आयपीएल २०२२ मेगा लिलावात विकला गेला नाही. चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्याला कायम ठेवले नव्हते. तसेच लिलावातही त्याला पुन्हा विकत घेण्यात रस दाखवला नाही.

‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या, रैनाला किमान त्याच्या मूळ किमतीत (२ कोटी) कोणत्यातरी संघाकडून निवडले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही आणि तो विकला गेला नाही. अलीकडे, रैनाला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या नवीन फ्रँचायझीकडून निवडले जाणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या.

मेगा लिलावात निवडलेला इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याने आगामी आयपीएलमधून माघार घेतली आहे. बायो बबलमधील थकल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेणार असल्याचे त्याने सांगितले होते.

रॉय स्पर्धेतून बाहेर झाल्यामुळे त्याच्या जागी रैनाला गुजरात टायटन्स आपल्या संघात सामील करून घेणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. गुजरात संघाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सुरेश रैना गुजरात संघाचा भाग नसेल. आम्ही त्याच्या नावाचा विचारही केला नाही. तो आमच्या योजनेचा भाग नाही.’ गुजरात संघाकडून आलेल्या या माहितीमुळे आता काही काळ तरी रैना आयपीएल खेळताना दिसण्याची शक्यता कमी झाली आहे. रैना आयपीएल इतिहासात चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. गुजरात संघ आपला पहिलाच हंगाम खेळणार असून हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

आयपीएल २०२२ साठी गुजरात संघ-

हार्दिक पंड्या, राशिद खान, शुबमन गिल, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर साई किशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंग, वरुण आरोन, बी साई सुदर्शन.

महत्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---