आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांना नव्याने सामील केले गेले. पदार्पणाच्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. संघातील खेळाडूंच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे त्यांना हे यश मिळाले. पण मुख्य प्रशिक्षर आशीष नेहरा यानेही स्वतःची गुणवत्ता दाखवत ही ट्रॉफी जिंकण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. नेहरा विजेतेपदासोबत मैदानात पारंपारीक पद्धतीने खेळाडूंना प्रशिक्षण देत असल्यामुळे देखील चांगलाच चर्चेत आला होता. आता याच पार्श्वभूमीवर त्याने एक खुलासा केला आहे, ज्याची उत्सुकता चाहत्यांना आयपीएल 2022 पासू लागून होती.
आयपीएल 2022 (IPL 2022) हंगाम सुरू झाल्यानंतर अनेकांना गुजरात टायटन्स यावर्षीचे विजेतेपद पटकावेल. हार्दिक पंड्याला यापूर्वी चाहत्यांनी कर्णधाराच्या रूपात कधी पाहिले नव्हते, पण त्याने ही जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. तसेच मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात आशिष नेहरा (Ashish Nehra) देखील यशस्वी ठरला. हंगामाच्या सुरुवातीलाच नेहराचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याच्या हातात चाहत्यांना एक कागद दिसत होता.
जेव्हा इतर सर्व प्रशिक्षक लॅपटॉपच्या मदतीने खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात, त्याठिकाणी नेहरा मात्र पारंपारिक पद्धत वापरत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनेकांनी असा अंदाज बांधला होता की, या कागदावर संघाची काहीतरी खास रणनीती असावी. आता नेहराने याविषयी स्वतः खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “कागदानवर काहीच नव्हते. काय माहिती सर्वांनाच असे का वाटते. मी या गोष्टी आधीही ऐकल्या आहेत. कागदावर फक्त यादी होती, जी आम्हाला दुसऱ्या दिवशी सराव सत्रात वापरायची होती.”
“मी कोणी सुपर कोच नाहीये. तुमच्यासारखाच मी देखील बाहेर बसलेला एक प्रेक्षक आहे. जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा तुम्ही सर्वजण या गोष्टींविषयी बोलू लागतात. सर्व प्रशिक्षक खूप मेहनत करतात आणि सर्वांना त्याचे फळ मिळते. गुजरात टायटन्ससोबत आमचे पहिले वर्ष वर्ष खरंच खूप चांगले राहिले आणि आम्ही आनंदी आहोत,” असेही नेहरा पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, आयपीएलच्या मागच्या हंगामात पदार्पण करणाऱ्या गुजरात संघाने ग्रुप स्टेजमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून प्लेऑफ्समध्ये स्थान बनवले. पहिल्या क्वालिफायरमध्ये संघाने राजस्थान रॉयल्सला हरवून अंतिम सामना गाठला. तसेच अंतिम सामन्यात देखील त्यांना पुन्हा एकदा राजस्थानलाच मात दिली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताचे पारडे जड, पण ‘हे’ आकडे पाहून वाढले चाहत्यांचे टेंशन
LLC: भिलवाडा किंग्सच्या विजयात कॅरेबियन्स चमकले! युसुफची पुन्हा मॅचविनिंग खेळी