---Advertisement---

गिलने पुन्हा जिंकले दिल! सनरायझर्सला चोपत झळकावले पहिले आयपीएल शतक

On: सोमवार, मे 15, 2023 9:12 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62 वा सामना सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 188 अशी मोठी धावसंख्या उभारली. गुजरातच्या या डावात सलामीवीर शुबमन गिल याने सर्वाधिक योगदान दिले. नेत्रदीपक फलंदाजीचे प्रदर्शन करताना त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले.

 

या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर गुजरातला पहिल्या षटकात शून्य धावेवर साहाच्या रूपाने पहिला धक्का बसला. मात्र, त्यानंतर शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी अक्षरशा धावांचा रतीब घातला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. त्यामध्ये गिल याचे सर्वाधिक योगदान राहिले. आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक झळकावताना त्याने 58 चेंडूवर 101 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

गुजरातच्या डावाचा विचार केल्यास पहिल्या षटकात शून्यावर पहिला गडी बाद झाल्यानंतर गिल व सुदर्शन या जोडीने 147 धावांची भागीदारी केली. सुदर्शन याने 47 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले. गुजरातच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्याने त्यांचे अखेरचे 8 फलंदाज 41 धावांवर बाद झाले. हैदराबादसाठी भुवनेश्वर कुमार याने सर्वोत्तम कामगिरी करताना 5 बळी आपल्या नावे केले.

(Gujarat Titans Opener Shubman Gill Hits Maiden IPL Century Against Sunrisers Hyderabad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी गावसकरांनी भेदला सुरक्षा घेरा, पळत जाऊन मारली मिठी, पाहा संपूर्ण व्हिडिओ
IPL 2023मध्ये का घेतल्या नाहीत जास्त विकेट्स? दिग्गज नारायणने दिले ‘हे’ खळबळजनक उत्तर, वाचाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---