---Advertisement---

नरेंद्र मोदी स्टेडियम ठरतंय गिलसाठी ‘शुभ’! आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही घातलाय धावांचा रतीब

On: मंगळवार, मे 16, 2023 11:02 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62 वा सामना सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने 34 धावांनी दणदणीत विजय मिळवत प्ले ऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला. या विजयात सलामीवीर शुबमन गिल याचे मोठे योगदान राहिले. आपले पहिले आयपीएल शतक झळकावताना त्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले.

या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी अक्षरशा धावांचा रतीब घातला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी (147 धावा) रचली. त्यामध्ये गिल याचे सर्वाधिक योगदान राहिले. आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक झळकावताना त्याने 58 चेंडूवर 101 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

गिल 2023 या वर्षात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अक्षरशः धावांचा पाऊस पाडताना दिसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याची बॅट चांगलीच बोलली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत त्याने 124 धावांची खेळी केली होती. तर, न्यूझीलंडविरुद्ध टी20 मध्ये त्याने 126 धावांची नाबाद खेळी केलेली.

यावर्षी आयपीएलमध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळताना देखील त्याचा हा फॉर्म दिसून आला. त्याने या हंगामात नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुक्रमे 63, 39, 45, 56, 6, नाबाद 94 व‌ 101 अशा धावा केल्या आहेत. आयपीएल 2023 चा अंतिम सामना याच मैदानावर होणार असल्याने त्याचा हाच फॉर्म कायम राहिल्यास गुजरातला सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावण्याची संधी राहील.

(Gujarat Titans Shubman Gill Extraordinary Stats At Narendra Modi Stadium Ahmedabad In 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचा विजयरथ सलग दुसऱ्या हंगामात सुसाट! पुन्हा चालली हार्दिक-नेहराजींची जादू 
शमीचा ‘पर्पल पॅच’ सुरूच! सनरायझर्सला लोळवत पुन्हा बनलाय नंबर वन 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---