आगामी आयपीएल हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. तत्पूर्वी आयपीएलमध्ये 2022च्या हंगामात गुजरात टायटन्सनं (Gujrat Titans) पदार्पण केलं होतं. गुजरातनं पहिल्याच हंगामात आयपीएलची ट्राॅफी उंचावली होती. त्यावेळी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) होता. दुसऱ्या हंगामात देखील गुजरातचा संघ फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी राहिला होता. पण सीएसकेनं त्यांना फायनलमध्ये पराभूत केलं, त्यानंतर युवा कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) संघाला प्ले-ऑफमध्ये पोहचवण्यात यशस्वी राहिला नाही. त्यामुळे आगामी हंगामात गुजरात टायटन्स संघामध्ये काही बदल करु शकते.
मात्र, मेगा लिलावाच्या आधी प्रत्येक संघाला त्यांच्या काही खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ इच्छा नसताना देखील त्यांच्या काही स्टार खेळाडूंना संघातून सोडू शकतो. या बातमीद्वारे आपण अशा 3 खेळाडूंची नाव जाणून घेऊया ज्यांनी गुजरातसाठी चमकादार कामगिरी केली आहे आणि त्यांना गुजरातचा संघ इच्छा नसताना देखील संघातून सोडू शकतो.
राहुल तैवतिया- राहुल तैवतियानं गुजरातसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यानं गुजरातला अनेक अडचणीच्या सामन्यात विजय मिळवून दिले आहेत. गुजरातसाठी तो नेहमीच एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे. पण गुजरातला मेगा लिलावापूर्वी संघात कायम ठेवण्यासाठी अनेक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे गुजरात टायटन्स राहुल तैवतियाला लिलावापूर्वी सोडू शकते.
मोहित शर्मा- मोहित शर्मानं (Mohit Sahram) गुजरातकडून खेळताना जोरदार पुनरागमन केलं होतं. त्याचा आयपीएल पासून भारतीय संघात परतण्याचा प्रवास चांगला होता. पण अचानकच तो काही दिवसांकरिता खेळताना दिसला नाही. त्यानंतर त्यानं आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळताना चांगली कामगिरी केली. पण गुजरात टायटन्सचा संघ मोहित शर्माला आगामी लिलावापूर्वी सोडू शकतो. कारण संघात मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज असताना गुजरात मोहितला रिलीज करु शकते.
जोशुआ लिटल- आयर्लंडच्या या खेळाडूनं आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाकडून खेळताना सकारात्मक गोलंदाजी केली. तो गुजरातसाठी एक महत्वपूर्ण गोलंदाजाची भूमिका बजावताना दिसला. पण संघात विदेशी अनुभवी खेळाडू फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) आणि धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर असल्यामुळे गुजरात जोशुआ लिटलला आगामी मेगा लिलावापूर्वी सोडू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
शाळेच्या गणवेशात मुलीने केली बुमराहची बॉलिंग ॲक्शन, पाहा VIDEO
राहुल द्रविडच्या मुलाने ठोकला खणखणीत षटकार, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
‘ही अशी ट्रॉफी..’, बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यासाठी पॅट कमिन्स आतुर!