बुधवारी (दि. २७ एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४०वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात गुजरात संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. हा गुजरातचा हंगामातील सातवा विजय होता. या विजयाचे शिल्पकार राशिद खान आणि राहुल तेवतिया ठरले. मात्र, सामनावीराचा पुरस्कार हैदराबादच्या उमरान मलिकला मिळाला.
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने ६ विकेट्स गमावत १९५ धावा चोपल्या. हैदराबादच्या १९६ धावांचे आव्हान गुजरात संघाने ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.
Match 40. Gujarat Titans Won by 5 Wicket(s) https://t.co/r0x3cHhUK0 #GTvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2022
गुजरातकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३८ चेंडूंचा सामना करताना ६८ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि तब्बल ११ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी सर्वोत्तम फलंदाजी केली. तेवतियाने २१ चेंडूत नाबाद ४० धावांची उत्तुंग खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता, तर राशिदने ११ चेंडूत ४ षटकारांसोबत नाबाद ३१ धावा केल्या. यामध्ये एका विजयी षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे, शुबमन गिलने २२ धावांचे योगदान दिले. इतर कोणत्याही फलंदाजाला २०पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत, पण त्याचा संघावर कोणताही फरक पडला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना एकट्या उमरान मलिकने (Umran Malik) चमकदार कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि एडेन मार्करम यांनी सर्वोत्तम फलंदाजी केली. अभिषेकने ४२ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. तसेच, मार्करमने ४० चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त फक्त शशांक सिंगला २५ धावांची खेळी करता आली. इतर कोणालाही २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार केन विलियम्सन तर फक्त ५ धावा करून तंबूत परतला.
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त यश दयाल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी १ विकेट खिशात घातली.
या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत पुन्हा एकदा टॉप केला आहे. तसेच, सनरायझर्स हैदराबाद संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंचांसोबत वाद आणि राजस्थानविरुद्धचा पराभव पचवण्यासाठी लागले ‘एवढे’ दिवस, वॉटसनचा खुलासा
माजी भारतीय प्रशिक्षकाचा दावा; म्हणे, पंजाब किंग्जचा ‘हा’ युवा गोलंदाज टीम इंडियात बनवणार जागा
‘सीएसके त्याचे कुटुंब आहे, बंदी उठल्यानंतर आनंदात होता माही’, इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया