---Advertisement---

RCB vs GT : RCB चा पराभव करून गुजरातने मिळवला शानदार विजय

On: बुधवार, एप्रिल 2, 2025 11:21 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 14वा आज (02 एप्रिल) खेळला गेला. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमने सामने होते. हा सामना बंगळुरुच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चिन्नास्वामी येथे खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हाच सामना गुजरात टायटन्स संघाने 8 विकेट्सने जिंकला आहे. आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या बंगळुरूचा हा पहिला पराभव त्यांच्याच होमग्राउंड वरती झाला. गुजरातने 13 चेंडू राखून 17.5 षटकात हा सामना आपल्या नावावरती केला आहे.

बंगळुरू साठी प्रथम फलंदाजी करताना संघासाठी सर्वाधिक धावा एल लिंग्विस्टन (54) आणि जे शर्मा (33) यांनी केल्या. त्याचबरोबर, टीम डेव्हिड याने नाबाद राहून 12 चेंडूत 16 धावा केल्या. परंतु, कर्णधार पाटीदार केवळ 12 धावा करू शकला. विराट कोहली निव्वळ सहा चेंडूत 7 धावा करून बाद झाला.

गुजरात संघासाठी सर्वाधिक धावा जोस बटलर याने केल्या. जोस बटलर ने शेवटपर्यंत नाबाद राहून 39 चेंडूत 73 धावा केल्या. त्यानंतर साई सुदर्शनने 36 चेंडूत 49 सर्वाधिक धावा केल्या. गुजरात साठी सर्वोत्तम गोलंदाजी मोहम्मद सिराज ने केली त्याने चार षटकात फक्त 19 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. तसेच साई किशोरने दोन विकेट्स घेतल्या. बाकीच्या गोलंदाजांनी एक एक विकेट्सघेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---