---Advertisement---

IPL 2025: गुजरात विरुद्ध मुंबई महासंग्राम, कोण मारेल बाजी?

On: शनिवार, मार्च 29, 2025 4:20 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 9 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या आमने-सामने असणार आहेत. आज हार्दिक पांड्या खेळताना दिसणार आहे. बँनच्या कारणाने तो पहिला सामना खेळू शकला नव्हता. गुजरात आणि मुंबईचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

आयपीएल 2025 मध्ये पहिल्या सामन्यात गुजरात आणि मुंबई दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईला चेपॉकमध्ये चेन्नई पराभूत केले होते, तसेच गुजरातला त्यांच्या घरेलू मैदानावर पंजाब किंग्सने हरवले होते. आज दोन्ही संघांमध्ये एका संघाला त्यांचा पहिला विजय मिळेल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या खेळपट्टी बद्दल बोलायचे झाल्यास ती फलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्या खेळपट्टीवर हंगामाच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने 243 धावा केल्या होत्या, त्यानंतर गुजरातला फक्त 11 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात आणि मुंबईच्या सामन्यांमध्ये सुद्धा चौकार- षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. पुन्हा एकदा इथे मोठी धावसंख्या होऊ शकते.

मॅच प्रिडक्शन नुसार या सामन्यात मुंबई संघाचं पारडं जड आहे. दोन्ही संघांच्या बद्दल बोलायचे झाल्यास गुजरात संघ 3-2 ने पुढे आहे. गुजरात संघ जरी त्यांच्या घरेलू मैदानावर खेळत असला तरी, या हंगामात मुंबईचा संघ खूप मजबूत दिसत आहे. धावांचा पाठलाग करणारा संघ आजचा सामना जिंकण्याची शक्यता आहे.

गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग इलेव्हन- शुबमन गिल (कर्णधार), जॉस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, शरफेन रदरफोर्ड, वाशिंगटन सुंदर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, कगिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा

इम्पैक्ट खेळाडू- मोहम्मद सिराज

मुबंई इंडियन्स संघाची प्लेइंग इलेव्हन- रियान रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जैक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सेंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट आणि सत्यनारायण राजू

इम्पैक्ट खेळाडू- विग्नेश पुथुर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---