क्रिकेटच्या मैदानावर अनेक खेळाडू आश्चर्यकारक रेकाॅर्ड्स रचतात. दरम्यान आता एका 18 वर्षाच्या खेळाडूने चमकदार कामगिरी केली आहे. गुजरातच्या द्रोणा देसाईने (Drona Desai) स्थानिक क्रिकेट स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत 498 धावांची अप्रतिम खेळी खेळली. त्याच्या या खेळीने क्रीडा विश्वात एक नवी खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी या बामतीद्वारे आपण हा 18 वर्षीय फलंदाज, ज्याने एलिट रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे हा कोण आहे? हे जाणून घेऊया.
18 वर्षीय द्रोणा देसाईने (Drona Desai) गुजरातमधील गांधीनगर येथे दिवाण बल्लूभाई कप अंडर-19 स्पर्धेदरम्यान इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव नोंदवले. तरुण वयात देसाईने आपल्या शाळेसाठी सेंट झेवियर्स (लोयोला) जेएल इंग्लिश स्कूल विरुद्ध शिवाय क्रिकेट ग्राउंड येथे 498 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली. त्याची आक्रमक शैली पाहून एकेकाळी गोलंदाजांचेही भान सुटले. देसाईने 86 चौकारांसह 7 उत्तुंग षटकार ठोकले.
द्रोणा देसाई (Drona Desai) म्हणाला की, “परिस्थिती अशी आहे की आठवी ते बारावीपर्यंत मी फक्त परीक्षेसाठीच शाळेत जातो. मी फक्त क्रिकेट खेळत राहिलो आणि एक दिवस मोठी कमाई करेन अशी आशा करतो.”
शानदार खेळीसह देसाईने शालेय क्रिकेटच्या एलिट रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. दरम्यान तो एका डावात सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी केवळ पाच फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड मुंबईच्या प्रणव धनावडे (नाबाद 1,009), पृथ्वी शॉ (546), डॉ. हवेवाला (515), चमनलाल (नाबाद 506) आणि अरमान जाफर (498) यांच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! जास्त फॅन्स आल्यास स्टेडियमचा स्टँड कोसळेल, भारत-बांगलादेश कसोटीसाठी तिकिटांच्या विक्रीवर बंदी
शतकानंतरही इशान किशनला टीम इंडियात संधी मिळणार नाही? जाणून घ्या कारण
VIDEO : पॅट कमिन्सने सुरू केली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तयारी, नेट्समध्ये जबरदस्त घाम गाळला