Kusal Mendis Wicket: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI Eliminator Match) यांच्यात सुरू असलेल्या एलिमिनेटर सामन्यात चाहत्यांना एक असा दुर्मिळ क्षण पाहता आला, जो क्रिकेटच्या मैदानावर फार कमी वेळा दिसतो. मुंबई इंडियन्ससाठी हा प्रसंग खूप चांगला ठरला, तर गुजरात टायटन्सचे चाहते हा क्षण पाहून चांगलेच निराश झाले.
वास्तविक, गुजरात टायटन्ससाठी आज आयपीएलचा पहिला सामना खेळायला उतरलेला कुसल मेंडिस मुंबई इंडियन्सविरुद्ध एका अनोख्या पद्धतीने बाद झाला. त्याने ‘हिट विकेट’ (Hit Wicket) द्वारे आपली विकेट गमावली, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. (Kusal Mendis Hit Wicket)
मुंबई इंडियन्सविरुद्ध कुसल मेंडिस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. तो या सामन्यात चांगल्या लयीतही दिसत होता. मात्र, गुजरातच्या डावाच्या सातव्या षटकात त्याच्याकडून एक चूक झाली. मुंबईसाठी हे षटक मिचेल सँटनर टाकत होता.(Mitchell Santner Bowling) या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सँटनरने चेंडू थोडा मागे टाकला. ज्यावर मेंडिसने बॅकफूटवर जाऊन पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.
तो बॅकफूटवर गेला आणि पुल शॉटही खेळला, पण त्याचा पाय मागे जाऊन विकेटला लागला आणि त्याला ‘हिट विकेट’च्या स्वरूपात आपली विकेट गमवावी लागली. त्याची विकेट पडल्यानंतर गुजरातचे चाहते खूपच गोंधळले. इतक्या मोठ्या सामन्यात मेंडिस अशी चूक करेल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. मेंडिसच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 10 चेंडूत 20 धावा केल्या. आपल्या फलंदाजीदरम्यान मेंडिसने 1 चौकारांसह 2 खणखणीत षटकार ठोकले. (Kusal Mendis Score)
What happened there? ????
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Updates ▶ https://t.co/R4RTzjQfph#TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/cjbUB9pFyN






