---Advertisement---

पहिल्या अल्टीमेट खो-खो स्पर्धेत सलामीच्या लढतीत गुजरात जायंट्सची विजयी सलामी

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 11:00 PM
---Advertisement---

पुणे (14 ऑगस्ट 2022) पहिल्या अल्टीमेट खो खो स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत गुजरात जायंट्स संघाने मुंबई खिलाडीज संघाचा 69-44 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात मध्यंतराला मुंबई खिलाडीज संघाकडे 22-02 अशी आघाडी होती. त्याआधी गुजरातचा कर्णधार रंजन शेट्टीने नाणेफेक जिंकून सरंक्षण स्वीकारले. पहिल्या तुकडीत विनायक पारडे अक्षय भंगारे आणि मारीप्पा यांनी सुरुवात केली. परंतु मुंबई खिलाडीज संघाने दोन मिनिटाच्या आतच ही तुकडी तंबूत परतवली. त्यानंतर गुजरात संघाने आक्रमण करताना चांगली सुरुवात केली. परंतु मुंबईच्या रोहन कोरेने तीन मिनिटे दोन सेंकद संरक्षण करताना गुजरातला रोखुन धरले मात्र गुजरातच्या आक्रमण फळीने जोरदार पुनरागमन करताना पहिल्या डावाअखेर 26-24 अशी निसटती आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात मुंबई संघाने आपल्या खेळात लक्षणीय सुधारणा करताना पहिल्या सात मिनिटांनंतर 44-30 अशी आघाडी मिळवली खरी, परंतु अंतिम सत्रात गुजरात जायंट्सने जबरदस्त कामगिरी बजावताना तब्बल 39 गुणांची कमाई करून 69-44 अशा निर्णायक विजयाची नोंद केली.

लक्षावधी भारतीय क्रीडा प्रेमींना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या अल्टीमेट खो खो लीग या स्पर्धेला आज अत्यंत दिमाखात आणि अत्यंत उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. मुंबई खिलाडीज विरुद्ध गुजरात या सामन्यातुन खो खो च्या नव्या रूपाचे दर्शन सर्व प्रेक्षकांना घडले.

प्रेक्षकांचे प्रोत्साहन आणि ढोल ताशांचा गजर अशा रोमांचकारी वातावरनात या सामान्यच आनंद सर्वांनी लुटला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून ते 4 सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा रंगणार असून यामध्ये सहा फ्रॅंचायझीचे संघ विजेतेपदासाठी झुंजनार आहेत. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यावरून या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहेत.

पारंपरिक ढोल ताशांच्या निनादात भारतातील या पहिल्या व्यावसायिक खो खो लीगचे उदघाटन अल्टीमेट खो खो स्पर्धेचे कार्यकारी प्रमुख तेंझिंग नियोगी, अखिल भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल आणि महासचिव एम एस त्यागी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चेन्नई क्विक गन्स संघाचे प्रतिनिधी व मालक संजय झुपुडी आणि श्रीनाथ चित्तुरी, गुजरात जायंट्सचे सत्यम त्रिवेदी, ओडिशा जुगरनट्सचे लीलन साहू, मुंबई खिलाडीज जान्हवी धारिवाल-बालन व पुनीत बालन बादशहा, राजस्थान वारीयर्सचे जिगर शहा तेलगू योद्धाजचे जी एम रुचिर आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---