जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या, इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाला अखेर नवा चॅम्पियन मिळाला. आपला पहिलाच हंगाम खेळत असलेल्या गुजरात टायटन्सने विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान मोडीत काढत, आयपीएल विजेते होण्याचा मान मिळवला. २०१६ नंतर प्रथमच मुंबई इंडियंस व चेन्नई सुपर किंग्सव्यतिरिक्त दुसऱ्या संघाने आयपीएल ट्रॉफी पटकावली. हंगामाच्या पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत गुजरातने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले आणि त्याच सातत्याच्या जोरावर त्यांना चॅम्पियन होण्याचा मान मिळाला. मात्र, या संपूर्ण स्पर्धेदरम्यान अशी काही कारणे राहिली, जी त्यांच्या या विजेतेपदासाठी कारणीभूत ठरली. त्याच कारणांचा आढावा घेणारा हा लेख…
उत्कृष्ट सांघिक खेळाचा नमुना
गुजरात टायटन्सने मिळवलेल्या या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्कृष्ट सांघिक खेळ. गुजरात टायटन्स संघातील एकही खेळाडू ऑरेंज कॅप किंवा पर्पल कॅपच्या शर्यतीत राहिला नाही. मात्र, संघाच्या विजयात सर्व खेळाडूंनी आपापले योगदान दिले. त्यांच्या तब्बल आठ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला. प्रत्येक सामन्यात संघासाठी एक नवा मॅच विनर समोर आला. राहुल तेवतिया, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, शुभमन गिल हे बॅटिंगमध्ये तर, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन व यश दयाल यांनी गोलंदाजीमध्ये आपले योगदान दिले.
हार्दिक पंड्याचे प्रेरणादायी नेतृत्व
स्पर्धा सुरू होण्याआधी हार्दिक पंड्या याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय मॅनेजमेंटने घेतला होता. हार्दिकला यापूर्वी नेतृत्व करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, एक चिलिंग ॲटीट्युड त्याने संपूर्ण संघामध्ये निर्माण केला. संघाची मागणी लक्षात घेऊन तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तसेच गरजेवेळी त्याने गोलंदाजी करत योगदान देखील दिले. संपूर्ण स्पर्धेमध्ये हार्दिकला अगदी अभावानेच रागवताना पाहिले गेले. त्याच्या याच समंजस व जबाबदारीयुक्त नेतृत्वाचा संघाला मोठा फायदा झाला.
आशिष नेहरा आणि संघातील खेळीमेळीचे वातावरण
गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचे मानले तर, संघातील वातावरण अत्यंत मैत्रीपूर्ण व खेळीमेळीचे राहिले. अगदी सराव सत्रापासून अंतिम सामन्यापर्यंत संघ एकजूट राहिला. या सर्वाचे श्रेय खेळाडू संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांना देतात. नेहरा यांनी खेळाडूंना खा, प्या आणि निवांत झोप घेऊनच सरावाल या असा कानमंत्र दिला होता. त्यांच्या या साध्या सोप्या शैलीमुळे खेळाडूंवरील दबाव पूर्णपणे कमी झाला. इतर कोच लॅपटॉप घेऊन बसत असताना, नेहरा हे फक्त पेन आणि कागदावर आपली स्ट्रॅटेजी बनवताना दिसून आले. तसेच त्यांना डग आउटमध्ये कमी आणि बाउंड्री लाईन जवळ संघाला सल्ला देताना वारंवार पाहिले गेले.
अनुभवी खेळाडूंनी स्वीकारली जवाबदारी
गुजरात टायटन्स संघांमध्ये इतर संघांच्या तुलनेत अत्यंत कमी अनुभवी खेळाडू होते. मात्र, त्या सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून संघाच्या विजयात योगदान दिले. उशिरा संधी मिळालेल्या वृद्धिमान साहाने दरवेळी संघाला वेगवान सुरुवात दिली. तर मागील चार सिझनपासून फ्लॉप ठरत असलेला डेव्हिड मिलर यावेळी संघाचा फिनिशर आणि सर्वात मोठा मॅचविनर म्हणून समोर आला. याव्यतिरिक्त राशिद खान यानेदेखील खेळाच्या तीनही विभागात चमकदार कामगिरी केली. तसेच, हार्दिकच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व देखील केले.
युवा खेळाडूंचे मोठी फौज
गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावण्याची कामगिरी खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवावर केली ते म्हणजे संघातील युवा खेळाडू. अजूनही अनकॅप्ड असलेला राहुल तेवतिया सातत्याने संघासाठी तारणहार बनत आला. अभिनव मनोहर याने पहिल्या हाफमध्ये संघासाठी फिनिशरची भूमिका निभावली. साई सुदर्शन व दर्शन नळकांडे यांनीदेखील मिळालेल्या संधीचे सोने केले. उशिराने संधी मिळालेल्या साई किशोर यानेदेखील किफायतशीर गोलंदाजी करत राशिद खानला स्पिन डिपार्टमेंटमध्ये मदत केली. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल हंगामामध्ये लक्ष वेधून घेतलेल्या खेळाडूंपैकी एक राहीला.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे व्वा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलसोबत ‘हा’ पठ्ठ्या करणार ओपनिंग? विस्फोटक फलंदाजीत माहीर
प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढत असा मिळवला हार्दिकच्या गुजरात टायटन्सने IPL 2022चा मुकूट
द्विपक्षीय टी२० मालिका बंद करा, म्हणजे एका वर्षात २ वेळा आयपीएल होईल; पाहा कोणी केलंय विधान