---Advertisement---

गुजरात टायटन्स लागले आयपीएलच्या तयारीला! सुरु केले पहिले सराव शिबिर

On: बुधवार, मार्च 2, 2022 11:53 AM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकतो. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स व लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवीन संघ प्रथमच खेळताना दिसतील. आता या आपल्या पहिल्या हंगामात चमकदार कामगिरी करण्यासाठी गुजरात संघाच्या खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. ज्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या, आक्रमक फलंदाज अभिनव मनोहर, अष्टपैलू दर्शन नळकांडे आणि वरिष्ठ वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉन सध्या बडोद्यातील आयपीसीएल मैदानावर प्रशिक्षण घेत आहेत. हे शिबीर २५ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, २ मार्चला संपेल. संघाचे मुख्य प्रशिक्षक आशीष नेहरा या खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. आयपीएलपूर्वी सर्व खेळाडूंसाठी सराव शिबिर अहमदाबाद येथे घेण्यात येण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/NalkandeDarshan/status/1498313629162086400?t=l9Dop7_nU2fZ-Ug7VikWMw&s=19

लिलावात बांधला उत्कृष्ट संघ

गुजरात टायटन्सने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मेगा लिलावात तरुण आणि उत्साही संघ तयार केला आहे. गुजरात टायटन्सने या मेगा लिलावात मोहम्मद शमी, जेसन रॉय आणि लॉकी फर्ग्युसन सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मोठी बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. या संघात राहुल तेवतिया, विजय शंकर, डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा यांचाही समावेश आहे. याशिवाय हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुबमन गिल हे लिलावापूर्वी ड्राफ्ट पद्धतीने संघात सामील झाले होते. नुकतेच जेसन रॉय याने वैयक्तिक कारणांसाठी यावर्षी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन संघ-

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, नूर अहमद, आर. साईकिशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंग, वरुण आरोन आणि बी साई सुदर्शन.

महत्वाच्या बातम्या-

विजेत्या, उपविजेत्यांनाच नाही, तर विश्वचषकातील सहभागी आठही संघांवर होणार पैशांचा वर्षाव, जाणून घ्या बक्षीसांची रक्कम (mahasports.in)

हिटमॅनच्या ताफ्यात ‘ड्रीम कार’! कोट्यवधींची किंमत तर, वापरणारे मोजकेच भारतीय (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---