---Advertisement---

गुजरात टायटन्सने शुबमन गिलला दिला नारळ? ट्विट करत लिहिले…

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 5:09 PM
Shubman-Gill
---Advertisement---

आपल्या पहिल्याच वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने पुढील हंगामाची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.‌ संघाचा सलामीवीर व विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला युवा फलंदाज शुबमन गिल याचे संघाशी असलेले नाते संपले, अशा आशयाचे ट्विट गुजरात टायटन्सच्या सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आले आहे.

 

शुबमन गिल याला आयपीएलमध्ये प्रथमच खेळत असलेल्या गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 पूर्वी ड्राफ्टद्वारे आपल्या संघात घेतले होते. त्याने देखील आपल्यावरील हा विश्वास सार्थ ठरवत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने संपूर्ण हंगामात 16 सामन्यात 34.50 च्या सरासरीने 483 धावा केल्या होत्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणार्या खेळाडूंमध्ये त्याचा पाचवा क्रमांक होता.

गुजरात टायटन्सने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘हा प्रवास नेहमी लक्षात राहील. तुझ्या उज्वल भविष्यासाठी आम्ही तुला शुभेच्छा देतो.’

या ट्वीटवरून अनेकांनी अनेक अर्थ काढण्यास सुरुवात केली आहे. काहींनी गिलला गुजरातने रिलीज केल्याचे म्हटले. तर काहींच्या मते गिल स्वतःचे नाव आयपीएल लिलावात देण्यासाठी इच्छुक आहे. काही वृत्तानुसार, गिल आगामी हंगामात आरसीबीसाठी खेळताना दिसू शकतो. असे देखील म्हटले आहे.

शुबमन गिल आयपीएलपासून शानदार फॉर्मात दिसून येतोय. वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावरील वनडे मालिकांमध्ये त्याने आपल्या बॅटने आग ओकली. या दोन्ही मालिकांमध्ये तो मालिकावीर ठरला. आपल्या अवघ्या नऊ सामन्यांच्या वनडे कारकीर्दीत दोन वेळा विदेशात मालिकावीर पुरस्कार जिंकणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. या शानदार फॉर्मनंतर त्याला इंग्लंडमधील ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लबने करारबद्ध केले असून तो सध्या इंग्लंडमध्ये खेळताना दिसतोय.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी खूपच बिझी आहे भारतीय संघ; पाहा कधी, कोणाविरुद्ध खेळणार आहे सामने?
पहिल्या पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग स्पर्धेत द व्हर्लविंड्स, बॉल ब्रेकर्स संघांचा सलग दुसरा विजय
‘बेबी.. स्विटी..’, धोनी अन् पत्नी साक्षीचा क्यूट संवादाचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---