चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी (१५ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ६२ वा सामना झाला. प्लेऑफमध्ये स्थान पक्के केलेल्या गुजरात आणि प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या चेन्नई संघातील ही लढत रोमांचक राहिली. गुजरातने त्यांचा विजयरथ कायम राखत ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला (CSK vs GT) २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात गुजरातने ५ चेंडू शिल्लक ठेवून ३ विकेट्सच्या नुकसानावर चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले. हा गुजरातचा हंगामातील दहावा विजय होता. या विजयासह त्यांच्या खात्यात सर्वाधिक २० गुण जमा झाले आहेत.
चेन्नईच्या १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून सलामीवीर वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने सर्वाधिक ६७ धावा चोपल्या. सलामीला फलंदाजीला येत त्याने डावाखेर नाबाद राहात ही मॅच विनिंग खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५७ चेंडू खेळले आणि १ षटकार व ८ चौकारही मारले. त्याच्याखेरीज डेविड मिलरने डावाच्या शेवटी नाबाद १८ धावांच्या खेळीचे योगदान दिले. तसेच मॅथ्यू वेड (२० धावा) आणि शुबमन गिल (१८ धावा) यांनीही उपयुक्त खेळी केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मात्र या सामन्यात ७ धावांवरच बाद झाला.
या डावात चेन्नईच्या गोलंदाजांची चांगले प्रयत्न केले. मथिशा पथिरानाने (Matheesha Pathirana) पदार्पणाचा सामना खेळताना प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ३.१ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत २ विकेट्स चटकावल्या. तसेच मोईन अलीला १ विकेट्स मिळाली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तत्पूर्वी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर केवळ १३३ धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक ५३ धावा फटकावल्या. मात्र आपले अर्धशतक करण्यासाठी त्याने ४९ चेंडू खेळले आणि १ षटकार व ४ चौकारही मारले. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील दहावे अर्धशतक होते. ऋतुराजव्यतिरिक्त एन जगदीशन यानेही नाबाद ३९ धावा जोडल्या. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी या सामन्यात केवळ ७ धावा करून बाद झाला.
या डावात गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि साई किशोर यांच्या पदरीही प्रत्येकी एक विकेट आली.
महत्त्वाच्या बातम्या-
दिवंगत क्रिकेटर सायमंड्सला चेन्नई आणि गुजरातच्या खेळाडूंनी ‘अशी’ वाहिली श्रद्धांजली
बॅटवर स्टिकर लावण्याचे क्रिकेटर्सला किती पैसे मिळतात? जाणून घ्या भारताच्या स्टार खेळाडूंबद्दल
तीन युवा भारतीय खेळाडू, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मिळू शकते संधी