आयपीएल २०२२ चा दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना झाला. नव्या गुजरात संघाने शुबमन गिल याची जबरदस्त खेळी आणि लॉकी फर्ग्युसन याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्लीला १४ धावांनी पराभूत केले. हा गुजरातचा हंगामातील सलग दुसरा विजय होता.
या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ ९ विकेट्स गमावत १५७ धावाच करू शकला आणि सलग दुसरा विजय नोंदवण्याची संधी गमावून बसला.
लॉकी फर्ग्युसनची अप्रतिम गोलंदाजी
गुजरातच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने चिवट झुंज दिली. परंतु तोही २९ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या मदतीने ४३ धावा करून बाद झाला. त्याच्याखेरीज ललित यादवने २५ आणि रोवमन पॉवेलने २० धावांचे योगदान दिले. परंतु या खेळी संघाच्या विजयासाठी पुरेशा नव्हत्या.
या डावात गुजरातकडून लॉकी फर्ग्युसनने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना केवळ २८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीनेही २ विकेट्सचे योगदान दिले. याशिवाय गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या यानेही २०१९ नंतर आयपीएलमधील पहिलीच विकेट घेतली आहे.
Make that four wickets for Lockie Ferguson 👏👏
Axar Patel departs for 8 runs.
Live – https://t.co/onI4mPMCUU #GTvDC #TATAIPL pic.twitter.com/1M1Qf4gVhq
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
शुबमन गिलची प्रशंसनीय फलंदाजी
तत्पूर्वी गुजरातकडून प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलने शानदार खेळी केली. सलामीला फलंदाजीला येत त्याने ४६ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ८४ धावा फटकावल्या. तसेच कर्णधार हार्दिक (३१ धावा) आणि डेविड मिलर (नाबाद २० धावा) यांच्या छोटेखानी खेळीही संघासाठी उपयुक्त ठरल्या.
या डावात दिल्लीकडून मुस्तफिजुर रेहमान आणि खलील अहमद यांनी गोलंदाजीचे चांगले प्रदर्शन केले होते. रेहमानने ३ तर खलीलने २ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुष्काच्या सुंदर फोटोला पाहून विराट पुन्हा एकदा पडला प्रेमात! कमेंट करत म्हणाला, ‘उफ टू हाॅट’
Video | डोक्याला चेंडू लागला, तरीही कॅमेरामॅनने दिली केसाला धक्काही न लागल्यासारखी रिऍक्शन
शास्त्रींना स्वत:वर आहे भरपूर विश्वास; म्हणे, आयपीएल खेळलो असतो, तर ‘इतक्या’ कोटींना गेलो असतो